आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुभव सिन्हांचा अनुभव:कार्तिकला पाठिंबा देताना अनुभव म्हणाले - कार्तिक अजूनही गप्प आहे आणि मी त्याच्या मौनाचा आदर करतो

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना रनोट हिने देखील दर्शवला होता कार्तिकला पाठिंबा

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता कार्तिक आर्यनला काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या 'दोस्ताना 2' आणि शाहरुख खानच्या 'फ्रेडी' या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. कार्तिक अनप्रोफेशनल वागत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. इतकेच नाही तर आनंद एल राय यांच्या आगामी चित्रपटातूनही कार्तिकला काढून टाकण्यात आल्याच्या चर्चांना ऊत आला होता. मात्र अद्याप कार्तिकने याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. तो या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगून आहे. आणि त्याच्या याच वागण्याचे बॉलिवूड प्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी कौतूक केले असून त्याला आपला पाठिंबा दर्शवला आहे. कार्तिकविरोधात जे कॅम्पेन सुरु आहे, ते चुकीचे असल्याचे मत त्यांनी नोंदवले आहे.

अनुभव यांचा अनुभव सांगतो...

अनुभव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कार्तिकचे कौतुक केले आहे. इतकेच नाही तर कार्तिकविरुद्ध इंडस्ट्रीत कट रचला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'जेव्हा एखादा निर्माता अभिनेत्याला चित्रपटातून बाहेर करतो किंवा अभिनेता स्वतःहून चित्रपट सोडतो तेव्हा ते दोघेही या विषयावर भाष्य करत नाहीत. प्रत्येकवेळी हेच होते. माझी अशी पक्की खात्री आहे की, कार्तिक आर्यन विरोधात कट रचला जातोय किंवा त्याच्याविरोधात एक कॅम्पेन सुरू कऱण्यात आले आहे. जे खूप चुकीचे आहे. कार्तिक अजूनही गप्प आहे आणि मी त्याच्या मौनाचा आदर करतो,' असे अनुभव म्हणाले आहेत.

दुसरीकडे आनंद एल राय यांनी मात्र कार्तिकला चित्रपटातून बाहेर केल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. याशिवाय कुमार मंगत पाठकदेखील कार्तिकच्या समर्थनात पुढे आले आहेत. त्यांनी कार्तिकसोबत एक चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनीच कार्तिकला इंडस्ट्रीत पहिला ब्रेक दिला होता. कार्तिकच्या आगामी चित्रपटांमध्ये 'भूल भुलैया 2' आणि 'धमाका' यांचा समावेश आहे.

कंगना रनोट हिने देखील दर्शवला होता कार्तिकला पाठिंबा
एप्रिल महिन्यात जेव्हा पहिल्यांदा कार्तिकला करण जोहरच्या चित्रपटातून बाहेर काढण्याच आल्याचे वृत्त आले होते, तेव्हाा कंगनाने कार्तिकला पाठिंबा दर्शवला होता. तिने सोशल मीडियावर काही
पोस्ट शेअर करत कार्तिकचे समर्थन केले होते. कंगनाने लिहिले होते, 'कार्तिक आर्यन मेहनत करुन इथपर्यंत पोहोचला आहे आणि तो असाच पुढे जात राहिल. माझी पापा जो आणि नेपो गँगला फक्त
एकच विनंती आहे कृपया त्याला एकटे सोडा. सुशांत सिंह राजपूतप्रमाणे त्याच्या मागे लागून आणि त्याला आत्महत्येस प्रवृत्त करू नका.

कार्तिक अशा चिल्लर लोकांना घाबरण्याची गरज नाही. काही आर्टिकल प्रकाशित करुन आणि काही घोषणा करुन हे लोकं तुझा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. नंतर या सर्व गोष्टींना तुच जबाबदार आहेस असे सांगून स्वत: गप्प राहतील. त्यांनी सुशांतला ड्रग्जचे व्यसन आहे आणि वागणूक व्यवस्थित नसल्याच्या अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या होत्या.

कार्तिक तू घाबरु नकोस आम्ही तुझ्यासोबत आहोत. ज्या लोकांनी तुला कधी मदत केलेली नाही अशी लोकं तुला तोडू शकत नाहीत. आज तुला एकटे वाटत असेल आणि टार्गेट केल्यासारखे देखील वाटत असेल. पण अजिबात असे काही वाटून घेऊ नकोस. सर्वांना या ड्राम क्वीन जो बद्दल माहिती आहे.'

बातम्या आणखी आहेत...