आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अलविदा बॉलिवूड:प्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा बॉलिवूडला रामराम, हंसल मेहता आणि सुधीर मिश्रा यांनीही दिली साथ; ट्विट करुन म्हणाले - चांगले चित्रपट बनवत राहुया

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुभव सिन्हा (डावीकडे), हंसल मेहता (मध्यभागी) आणि सुधीर मिश्रा या तीन दिग्दर्शकांनी बॉलिवूडशी संबंध तोडले आहेत. अनुभव यांनी सांगितले की, त्यांनी बॉलिवूडचा राजीनामा दिला, मात्र ते चित्रपट बनवत राहतील.
  • अनुभव सिन्हा यांना साथ देत हंसल मेहता आणि सुधीर मिश्रा यांनीदेखील बॉलिवूडचा राजीनामा दिला आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या घराणेशाही आणि गटबाजीवरुन चांगलेच वादंग पेटले आहे. वादविवाद, आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी सुरु आहेत. या सर्वांना कंटाळून 'थप्पड', 'आर्टिकल 15' यांसारखे गाजलेले चित्रपट दिग्दर्शित करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी बॉलिवूडला रामराम ठोकला आहे. इतकेच नाही तर त्यांना साथ देत हंसल मेहता आणि सुधीर मिश्रा यांनीदेखील बॉलिवूडचा राजीनामा दिला आहे. या तिघांनीही ट्विटरवर बॉलिवूड सोडण्याची घोषणा केली. अनुभव सिन्हा यांनी ट्विटरवर त्यांचे नाव बदलले आहे. अनुभव सिन्हा यांनी आपल्या नावापुढे  (Not Bollywood) असे  कंसात लिहिले आहे. 

  • ट्विट करुन अनुभव सिन्हा यांनी केली घोषणा  

अनुभव सिन्हा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले- 'आता बस्स झालं... मी बॉलिवूडचा राजीनामा देतोय'. याचा अर्थ अनुभव सिन्हा आता चित्रपट बनवणार नाहीत, असा नाहीये. ते बॉलिवूडपासून अंतर ठेवत आहेत. त्यांनी बॉलिवूडचा राजीनामा दिला आहे, आपल्या कामाचा नाही. अनुभव यांनी ट्विटर यूजर्सच्या प्रश्नांची उत्तरे देताना सांगितले की, ते फिल्म इंडस्ट्रीसाठी चित्रपट बनवत राहतील.

  • दोन दिग्दर्शकांचा मिळाला पाठिंबा

अनुभव सिन्हा यांना सर्वप्रथम सुधीर मिश्रा यांनी पाठिंबा दिला. त्यांनी ट्विट केले, ‘काय आहे बॉलिवूड? सत्यजित रे, राज कपूर, गुरु दत्त, बिमल रॉय, मृणाल सेन, ऋषिकेश मुखर्जी, विजय आनंद, जावेद अख्तर, तपन सिन्हा, गुलजार, शेखर कपूर, केतन मेहता यांच्या चित्रपटांनी प्रेरित होऊन मी या इंडस्ट्रीचा भाग झालो होतो. म्हणून आम्ही येथे कायम राहू.’  सुधीर यांच्याशिवाय हंसल मेहता यांनीही अनुभव सिन्हा यांना पाठिंबा दिला. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले,  ‘सोडून दिले. जे कधी अस्तित्वातच नव्हते.’

अनुभव सिन्हा यांनी सुधीर मिश्रा यांच्या या ट्विटवर उत्तर देताना लिहिले, ‘चला दोन लोक बॉलिवूडमधून बाहेर. आपण हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहून चित्रपट बनवुया', असे म्हणत सुरदार यांच्या कवितेतील ओळी, 'यह ले अपनी लकुटी कम्बरिया, बहुतही नाच नचायो', यांचा उल्लेख केला. 

अनुभव सिन्हा हे तुम बिन, मुल्क, आर्टिकल 15 आणि थप्पड यासारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. अनुभव यांच्या चित्रपटांची कथा सद्दस्थितीतील महत्त्वाच्या मुद्द्यांभोवती फिरते. अनुभव यांनी आपल्या चाहत्यांच्या काही प्रश्नांच्या उत्तरात लिहिले आहे की, ते आता यापुढे 'वूड'च्या बंधनात अडकणार नाहीत.