आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही कथा आपल्या मनावर अनोखी छाप निर्माण करतात आणि आपल्यामध्ये अधिकाधिक उत्सुकता निर्माण करतात. अशी एक कथा आहे सोनीलिव्हची सिरिज 'महारानी'. या सिरिजने लक्षवेधक कथानकासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. प्रबळ राजकीय नेता म्हणून उदयास येण्यासाठी समाजातील पुरूषप्रधान अडथळ्यांचा सामना करणा-या प्रमुख नायिकेच्या अवतीभोवती केंद्रित या सिरिजच्या मागील पर्वाने प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण केली. प्रेक्षकांच्या प्रतिक्षेचा शेवट करत ही सिरिज उत्साहवर्धक अशा दुस-या पर्वासह परतली आहे. या दुस-या सीझनमध्ये अभिनेत्री हुमा कुरैशीसह मराठमोळी अभिनेत्री अनुजा साठे एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.
साकारणार 'ही' भूमिका
राजकीय उमेदवाराच्या भूमिकेत प्रवेश करत अनुजा साठे किर्ती सिंगची भूमिका साकारणार आहे, जी भीमा भारतीची (सोहम शाह) विश्वासू बनते. आपल्या भूमिकेबाबत बोलताना अनुजा म्हणाली, ''मी भूमिकांसंदर्भात नेहमीच नशीबवान राहिली आहे. हाच ट्रेंड कायम राखत प्रेक्षकांना मी या सिरिजमध्ये नवीन अवतारात पाहायला मिळेल. किर्ती वास्तविक जीवनात मी जशी आहे त्यापेक्षा पूर्णत: विरूद्ध आहे. म्हणून अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी हा उत्साहवर्धक व समाधानकारक अनुभव होता. मला माझ्या भूमिकेचे विविध पैलू साकारताना स्वत:मध्ये बदल करावे लागले. सर्व कलाकार व टीम अत्यंत सहाय्यक राहिली आहे आणि मी त्या सर्वांसोबत काम करताना खूप धमाल केली.''
'महारानी 2'चे दिग्दर्शन रविंद्र गौतम यांनी केले आहे, तर सुभाष कपूर व नंदन सिंग हे या सिरिजचे शोरनर्स व लेखक आहेत. प्रमुख भूमिकेत हुमा कूरेशी असलेल्या या सिरिजमध्ये सोहम शाह, अमित सियाल, विनीत कुमार, इनाम उल हक, दिब्येंदू भट्टाचार्य, कनी कस्तुरी, प्रमोद पाठक आणि विनीत कुमार हे देखील प्रमुख भूमिकेत असणार आहेत.
अलीकडेच आला सिरिजचा टीझर
'महारानी 2'मध्ये हुमा शांत पण धाकड अंदाजात दिसतेय. टिझरची सुरुवात या सिरिजमध्ये भीम भारतीची भूमिका साकारणारा अभिनेता सोहम शाहने होते. भीम भारती हा रानी भारतीचा नवरा असतो. तो निवडणुकीत पत्नी राणी भारती (हुमा कुरैशी) विरुद्ध उभा आहे आणि जाहीर सभेत तिचा पराभव करणार असल्याचे म्हणतो. टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला असून ते याची आतुरतेने वाट बघत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.