आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...म्हणून 'लाल सिंग चड्ढा' फ्लॉप ठरला:अनुपम खेर यांनी केली आमिर खानची कानउघडणी, म्हणाले - 'कंटेंट चांगला असल्यास चित्रपट चालतोच'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ अभिनेता अनुपम खेर यांच्या मते, जर चित्रपटाचा कंटेंट चांगला असेल तर चित्रपटाला कुणीच बॉयकॉट करू शकत नाही. चित्रपट चांगला असल्यास तो हिट होतोच. अनुपम खेर यांनी नुकतेच 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाच्या अपयशावर भाष्य केलं आहे.

अनुपम खेर म्हणाले, "लाल सिंग चड्ढा हा काही फार उत्तम चित्रपट नव्हता. जर तो खरंच इतका उत्कृष्ट चित्रपट असता तर तो कोणत्याही परिस्थितीत चाललाच असता. आमिरचा 'पीके' चांगला चालला, हे सत्य तुम्ही स्वीकारायलाच हवे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती."

'तुम्ही बॉयकॉट करणाऱ्यांना थांबवू शकत नाही'
ANI शी बोलताना अनुपम खेर पुढे म्हणाले, "मी बॉयकॉट ट्रेंडचे अजिबात समर्थन करत नाही, पण आपण कोणालाही थांबवू शकत नाही. जर तुमचा चित्रपट चांगला असेल तर तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोच. उत्तमोत्तम चित्रपट करूनच या बॉयकॉट ट्रेंडवर आपल्याला मात करावी लागणार आहे."

अनुपम यांनी आमिरची केली कानउघडणी
अनुपम खेर म्हणाले, "चित्रपट चांगला असेल तर तो चालेल, चांगला नसेल तर चालणार नाही. बहिष्कारामुळे कोणताही चित्रपट चालणार नाही असे मला वाटत नाही. प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तो काहीही बोलू शकतो. पण आपण जे काही बोलते त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची ताकदही आपल्यात असायला हवी." अनुपम खेर यांनी आमिरच्या 2015 मधील विधानाकडे लक्ष वेधले.

एका वक्तव्यामुळे आमिरला रोषाला जावे लागले सामोरे
2015 मध्ये एका कार्यक्रमात आमिरने असहिष्णुतेच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. तो म्हणाला होता की, देशातील वातावरण पाहता तो कुटुंबासह देश सोडण्याचा विचार करतोय. आमिरने सांगितले होते की, किरण (आता आमिरची पुर्वाश्रमीची पत्नी) आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी नेहमीच भीतीच्या वातावरणात राहते.

आमिरच्या या वक्तव्यानंतर त्याच्याविरोधात जोरदार निदर्शने झाली होती. त्याच्या चित्रपटांना बॉयकॉटला सामोरे जावे लागले. आमिरच्या या वक्तव्याला 8 वर्षे झाली आहेत, मात्र आजही त्याला यासाठी विरोध सहन करावा लागत आहे. या विधानावर आमिरने अनेकदा खुलासाही केला आहे.

आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला होते. त्याने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील केले, परंतु बहिष्कारामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली. हा चित्रपट सुमारे 180 कोटी खर्च करून तयार करण्यात आला होता. मात्र आमिर खानच्या जुन्या वक्तव्यामुळे चित्रपट वादात सापडला. याचा परिणाम चित्रपटाच्या कलेक्शनवर झाला. या चित्रपटाचे भारतातील कलेक्शन 100 कोटींचा आकडाही गाठू शकले नाही. या चित्रपटाने जवळपास 70 कोटींची कमाई केली होती.

अलीकडील चित्रपट ज्यांना बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागला - ​​​​

रामसेतू

25 ऑक्टोबर 2022 रोजी रिलीज झालेला अक्षय कुमारचा 'रामसेतू' चित्रपटावरही बॉयकॉटचे सावट पाहायला मिळाले. चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटातील तथ्यांशी छेडछाड केल्याचा आरोप केला होता. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही या चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती.

ब्रह्मास्त्र

9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटालाही विरोधाचा सामना करावा लागला. चित्रपटातील एका दृश्यात रणबीर कपूर मंदिरात बूट घालून जाताना दाखवण्यात आले होते, त्यामुळे हिंदू संघटनांनी मोठा निषेध नोंदवला. याशिवाय चित्रपट निर्माता करण जोहरवर घराणेशाहीला समर्थन केल्याचा आरोप आहे, त्यामुळे त्याच्या बॅनरखाली बनत असलेल्या सर्व चित्रपटांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे बहिष्काराचा सामना करावा लागत आहे.

द कश्मिर फाइल्स

काश्मीर खोऱ्यात 1990 मध्ये झालेल्या हिंदू हत्याकांडावरील 'द कश्मिर फाइल्स' या चित्रपटावर जातीय तणाव वाढल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी बॉयकॉट ट्रेंड सोशल मीडियावर बराच काळ पाहायला मिळाला.

रक्षाबंधन​​​​​​​

अक्षय कुमारचा चित्रपट 'रक्षाबंधन'ची लेखिका कनिका ढिल्लन हिच्यावर सोशल मीडियावर हिंदूविरोधी गोष्टी लिहिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे रक्षाबंधनावरही बॉयकॉटचे सावट होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

आदिपुरुष​​​​​​​​​​​​​​

प्रभासचा मेगाबजेट चित्रपट 'आदिपुरुष' अद्याप रिलीज झालेला नाही. पण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर चित्रपटाबाबत बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाला. चित्रपटाच्या निर्मात्यांनी खराब VFX आणि श्रीराम, हनुमान आणि रावणाचा लूक चुकीचा दाखवल्याने त्याला टीकेला सामोरे जावे लागले.