आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडमधीस प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर हे सध्या त्यांच्या आगामी 'मेट्रो इन दिनो' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. नुकताच त्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुराग बसु हे अनुपम खेर यांच्यासाठी 'अंडा डोसा' बनवताना दिसत आहेत.
अनुपम खेर यांचा व्हिडिओ
अनुराग खेर यांचा हा व्हिडिओ 'मेट्रो इन दिनो' या चित्रपटाच्या सेटवरील आहे. अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 'मेट्रो इन दिनो' या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बसु हे चित्रपटाच्या सेटवर अनुपम खेर यांच्यासाठी अंडा डोसा बनवताना दिसत आहेत.
चित्रपटात रोल आणि प्लेटमध्ये डोसा चांगला दिला
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अनुपम खेर यांनी लिहिले आहे, "आजची बातमी, अनुराग बसु यांनी 'मेट्रो इन दिनों'च्या सेटवर माझ्यासाठी अंड्याचा डोसा बनवला आहे."
अंड्याचा डोसा खाल्ल्यानंतर अनुपम यांनी अनुराग यांचे कौतुक केले. "चित्रपटात भूमिकाही चांगली दिली आणि डोसाही उत्कृष्ट दिला. काहीही होऊ शकते. अनुराग बाबू की जय हो."
चाहत्यांनी केले पाककलेचे कौतुक
सोशल मीडियावर अनुपम खेर आणि अनुराग बसू यांच्या व्हिडिओला चाहत्यांनी पसंतीची पावती दिली आहे. चाहते व्हिडिओवर भरभरुन कमेंट करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, 'ऑलराऊंडर आमचे अनुराग सर.' आणखी एका चाहत्याने लिहिले, 'व्वा.. अनुराग सर... काय परफेक्ट डोसा बनवला आहे.'
अनुपम खेर यांचे आगामी चित्रपट
'कर्मा', 'तेजाब', 'राम लखन', 'दिल', 'सौदागर', '1942 ए लव स्टोरी', 'रूप की रानी चोरों का राजा' आणि 'हम आपके हैं कौन' यांसारख्या चित्रपटांमध्ये अनुपम यांनी काम केले. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटातील अनुपम यांच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले. याशिवाय ते अलीकडेच शिव शास्त्री बलबोला या चित्रपटात दिसले होते. आता लवकरच अनुपम कंगना रनोटच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटात दिसणार आहेत.
'मेट्रो इन दिनो' या चित्रपटात त्यांच्यासह आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, पंकज त्रिपाठी, नीना गुप्ता, कोंकणा सेन शर्मा, फातिमा सना शेख आणि अली फजल हे कलाकार झळकणार आहेत. 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटाच्या रिलीज डेटची अजून घोषणा करण्यात आलेली नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.