आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणींच्या हिंदोळ्यावर:अनुपम खेर यांनी वयाच्या 33 व्या वर्षी 7 वर्षे मोठ्या हेमा मालिनीच्या वडिलांची साकारली होती भूमिका, एकेकाळी ऑटोग्राफ मिळवण्यासाठी अनेक तास केली होती प्रतिक्षा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुपम खेर यांनी आठवणींना उजाळा दिला.

अभिनेते अनुपम खेर यांनी यश चोप्रा यांच्या 'विजय' चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या चित्रपटाच्या शूटिंगविषयीचा त्यांनी एक खुलासा केला आहे. या चित्रपटाच्या वेळी ते 33 वर्षांचे होते आणि त्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने सात वर्षे मोठ्या हेमा मालिनी यांच्या वडिलांची भूमिका वठवली होती. तर चित्रपटात ते राजेश खन्ना यांच्या सास-याच्या भूमिकेत होते.

डेब्यू चित्रपटात साकारली होती वयस्कर व्यक्तीची भूमिका
अनुपम खेर यांनी 'विजय' या चित्रपटातच नव्हे तर आपल्या डेब्यू चित्रपटातही वयस्कर व्यक्तीची भूमिका साकारली होती. 'सारांश' या पहिल्या चित्रपटात अनुपम खेर यांनी सेवानिवृत्त शालेय शिक्षकाची भूमिका साकारली होती. त्यावेळी ते फक्त 28 वर्षांचे होते. अनुपम यांनी लिहिले -"मी 33 वर्षांचा होतो, जेव्हा 'विजय'मध्ये हेमाजींच्या वडिलांची आणि राजेश खन्ना यांच्या सासऱ्याची भूमिका साकारली होती.'

ऑटोग्राफ मिळविण्यासाठी तासन्तास थांबले होते
अनुपम खेर यांनी आठवणींना उजाळा देताना सांगितले की, कॉलेजमध्ये असताना त्यांनी हेमा मालिनी आणि राजेश खन्ना यांचा ऑटोग्राफ मिळवण्यासाठी अनेक तास वाट पाहिली होती. त्यावेळी हे दोघेही शिमलामध्ये 'हमसे तुमसे प्यार कितना'चे शूटिंग करत होते. शेवटी, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.

बातम्या आणखी आहेत...