आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेटक-यांनी केले ट्रोल:अनुपम खेर म्हणाले- 'मोदीच येणार', नेटकरी म्हणाले - 'निर्लज्जपणासाठी नोबेल पारितोषिक मिळाल्यास अनुपम खेरचे नाव सर्वप्रथम येईल'

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुपम खेर यांना शेखर यांचे सरकारवर टीका करणे आवडले नाही

अभिनेते अनुपम खेर आपल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे नेटक-यांच्या निशाण्यावर आले आहेत. कोरोनाच्या संकटाच्या काळात त्यांचा मानवी संवेदना आणि दु:खाशी काही संबंध नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. अनुपम यांनी ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांच्या एका पोस्टला रिट्विट करत लिहिले, 'सरकारवर टीका करणे गरेजेचे आहे. पण कोरोनाचा सामना करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. घाबरु नका. येणार तर मोदीच.’ अनुपम खेर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे समर्थन केलेले पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

अनुपम खेर यांना शेखर यांचे सरकारवर टीका करणे आवडले नाही
ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले होते, 'मी नैसर्गिक आपत्ती, युद्ध, अन्नटंचाई अशा अनेक परिस्थिती पाहिल्या आहेत. पण फाळणीनंतर आलेले हे सर्वात मोठे संकट आहे आणि भारताने यापूर्वी कधीही असे अकार्यक्षम सरकार पाहिले नव्हते. कोणतेही नियंत्रण कक्ष नाही, कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही. हा प्रशासनाचा आभाव आहे,’ अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली होती.

अनुपम खेर यांना शेखर यांचे म्हणणे पटले नाही आणि त्यांनी शेअर गुप्तांना सुनावले. पण अनुपम खेर यांनी मांडलेले मत नेटक-यांना मात्र पटले नाही आणि त्यांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली.

नेटक-यांनी सुनावल्यानंतरही अनुपम यांनी पोस्ट डिलीट केली नाही
एका नेटक-याने अनुपम यांना खडे बोल सुनावताना लिहिले, ‘वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे दररोज हजारो लोक भारतात मरत असताना अनुपम खेर यांनी आज येणार तर मोदीच असे म्हटले. त्या पेक्षा कलाकारांनी न बोललेले बरे’ असे म्हटले आहे. दुसर्‍या नेटक-याने लिहिले- 'अनुपम खेर निःसंशयपणे कंगना रनोटचे मेल व्हर्जन आहे.' आणखी एका नेटक-याने लिहिले- 'निर्लज्जपणासाठी नोबेल पारितोषिक मिळाल्यास अनुपम खेर यांचे नाव सर्वप्रथम येईल.'

नेटक-यांनी चांगलीच शाळा घेतल्यानंतरदेखील अनुपम खेर यांनी आपली पोस्ट सोशल मीडिया अकाउंटवरुन डिलीट केलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...