आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीव्र प्रतिक्रिया:काश्मिरी सरपंचांच्या मृत्यूबद्दल शशी थरूर यांनी केलेल्या ट्विटवरून अनुपम खेर संतापले, म्हणाले- तुमच्या विचारसरणीला काय झाले?

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शशी थरूर यांनी लिहिले होते की, देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांची हत्या होत आहे

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी केलेल्या ट्विटवरुन त्यांच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. थरूर यांनी आपल्या ट्विटमध्ये काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी ठार केलेल्या एकमेव काश्मिरी पंडित सरपंचांच्या हत्येला एका काँग्रेस कार्यकत्याची हत्या म्हटले आहे. त्यानंतर खेर यांनी तुमच्या विचारसरणीला काय झाले आहे? असा प्रश्न थरुर यांना केला आहे.

थरूर यांच्या ट्विटवर तीव्र नाराजी व्यक्त करताना अनुपम यांनी लिहिले, 'प्रिय शशी थरूर, तुम्ही एवढे शिकलेले व्यक्ती आहात. तुमच्या विचारसरणीला काय झाले आहे? या परिस्थितीत, जेव्हा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत दहशतवादी एखाद्या ठार मारतो, तेव्हा तो एका भारतीयाला मारत असतो, कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्याला नाही. एखादी गोष्ट किती फिरवून बोलला आहात. सोबतीचा असा वाईट परिणाम झाला आहे!!', अशा शब्दांत खेर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

  • थरूर यांनी लिहिले- देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांची हत्या होत आहे

माजी केंद्रीय मंत्री आणि केरळमधील तिरुअनंतपुरम येथून काँग्रेसचे खासदार असलेल्या शशी थरूर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, 'धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या भूमिकेमुळे काश्मीर ते केरळ पर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. संदेश स्पष्ट आहे, आयडिया ऑफ इंडियाच्या सर्व शत्रूंना काँग्रेसमुक्त भारत हवा आहे', असे थरुर यांनी म्हटले होते. यांच्या या ट्विटवर अनुपम खेर यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

  • 8 जून रोजी झाली होती सरपंचांची हत्या

गेल्या सोमवारी 8 जून रोजी जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लरकीपोरा भागात दहशतवाद्यांनी सरपंच अजय पंडिता यांची गोळ्या घालून हत्या केली होती. सायंकाळी 6 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली होती. लष्कर ए तोयबाशी निगडीत दहशतवादी संघटना 'द रेझिस्टंस फ्रंट (TRF)'ने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. अजय पंडिता यांच्या घराजवळच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु, तिथे त्यांचा मृत्यू झाला होता .

  • अनुपम यांनी तीव्र संताप व्यक्त केला

या घटनेनंतर अनुपम यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, 'अनंतनागमधील एकमेव काश्मिरी पंडित सरपंच अजय पंडिता यांच्या निर्घृण हत्येमुळे मी फार दु: खी आणि संतप्त आहे. त्यांच्या कुटुंबीयांचे मी मनापासून सांत्वन करतो. या प्रकरणात, संशयितांनीदेखील मौन बाळगले आहे, अन्यथा ते धाय मोकलून रडण्याचे काम करत असतात, असे खेर यांनी म्हटले होते. काश्मीरमध्ये पुन्हा नव्वदच्या दशकाची पुनरावृत्ती होत आहे, असेही खेर यांनी म्हटले होते.  

बातम्या आणखी आहेत...