आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'हॅपी बर्थ डे' या शॉर्ट फिल्ममधील अभिनयासाठी 'बेस्ट अॅक्टर' हा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे याच पुरस्कार सोहळ्यात या शॉर्ट फिल्मला बेस्ट फिल्मचाही पुरस्कार मिळाला आहे. प्रसाद कदम यांनी 'हॅपी बर्थ डे' ही शॉर्ट फिल्म दिग्दर्शित केली आहे आणि चित्रपटाची निर्मिती एफएनपी मीडियाने केली आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये अनुपम खेर आणि आहना कुमरा प्रमुख भूमिकेत आहेत.
पुरस्कार मिळाल्याचे कळताच अभिनेते अनुपम खेर यांनी आनंद व्यक्त केला. अनुपम खेर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच 'हॅपी बर्थ डे' या शॉर्ट फिल्मच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. आहना कुमराचे त्यांनी विशेष आभार मानले.
'हॅपी बर्थ डे' या शॉर्ट फिल्मला न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'बेस्ट फिल्म' हा पुरस्कार पण मिळाला. एकाच फिल्मसाठी दोन पुरस्कार मिळाल्यामुळे निर्माता गिरीश जौहर यांनीही आनंद व्यक्त केला. अनुपम खेर हे एक ग्लोबल आयकॉन आहेत. आहना यांनाही नामांकन मिळाले होते. सर्वांनीच आपापल्या परीने उत्तम कामगिरी केली; असे गिरीश जौहर म्हणाले.
"एफएनपी मीडियासाठी ही एक मोठी बाब आहे. एका प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात 2 पुरस्कार मिळवणे एक अभिमानाची गोष्ट आहे. या चित्रपटामागील संपूर्ण टीमचं प्रयत्न आहे आणि खरोखरच चित्रपट पुरस्कारास पात्र आहेत,' असे एफएनपी मीडियाचे कंटेंट हेड अहमद फराज यांनी म्हटले आहे. 'हॅपी बर्थडे' ही शॉर्ट फिल्म लवकरच विविध प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.