आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुलासा:मुंबईत भाड्याच्या घरात राहतात अनुपम खेर, सांगितले - 'मी ठरवले होते कुठेच प्रॉपर्टी घेणार नाही फक्त शिमल्यात माझ्या आईसाठी एक घर घेईल'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुपम खेर यांनी आईला दिले एक स्पेशल गिफ्ट

बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी एका मुलाखतीत खुलासा केला की, ते मुंबईत अजूनही भाड्याने घेतलेल्या घरात राहतात. सोबतच त्यांनी सांगितले, त्यांनी एकमेव प्रॉपर्टी खरेदी केली जी शिमल्यात असून ती त्यांची आई दुलारी खेर यांच्यासाठी आहे.

मुंबईत भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटमध्ये राहतात अनुपम खेर
अनुपम खेर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'माझ्याजवळ मुंबईत एक सुद्धा घर नाही. मी येथे भाड्याने घेतलेल्या घरात राहतो. 4-5 वर्षापूर्वीच मी ठरवले की मी कुठेच प्रॉपर्टी घेणार नाही फक्त शिमलामध्ये माझ्या आईसाठी एक घर घेईल.' त्यांनी सांगितले की, त्यांची आई दुलारी यांनी शिमल्यात एका घराची मालकीण होण्याचे स्वप्न पाहिले होते. कारण अनेक वर्षे त्यांची आई तिथे भाड्याच्या घरात राहिल्या. त्यामुळे त्यांनी आईसाठी एक घर खरेदी केले.

अनुपम खेर यांनी आईला दिले एक स्पेशल गिफ्ट
अनुपम यांना त्यांच्या आईला काहीतर खास भेट द्यायची होती. त्यांनी त्यांच्या आईला घर दाखवले आणि हे घर तुझ्यासाठी खरेदी केल्याचे सांगितले. घर बघून आई दुलारी यांची प्रतिक्रिया सांगताना अनुपम म्हणाले, 'घर बघून आई मला ओरडली आणि ती मला म्हणाली की तुझे डोकं फिरले आहे का?, मला एवढ मोठे घर नको...'

आगामी 'शिव शास्त्री बडबोला'मध्ये दिसतील अनुपम खेर
वर्क फ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे अनुपम यांनी अलीकडेच त्यांच्या 519 व्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. 'शिव शास्त्री बडबोला' हे त्यांच्या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात नीना गुप्ता यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटाची कथा अमेरिकेतील एका छोट्या शहरात राहणाऱ्या भारतीयांचे अस्तित्व सांगते.

बातम्या आणखी आहेत...