आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनुपम खेर यांनी 'सारांश' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी एका आठवड्यात तब्बल 57 चित्रपट साइन केले होते. मात्र अनुपम खेर यांना अगदी सहजासहजी हा चित्रपट मिळाला नव्हता. आधी त्यांची भूमिकेसाठी निवड झाली. पण चित्रीकरणाच्या काही दिवसाआधी त्यांना चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. त्यांच्याजागी संजीव कुमार यांना कास्ट करण्यात आले होते. महेश भट्ट यांना शिव्याशाप दिल्याने अनुपम खेर यांची पुन्हा चित्रपटात वर्णी लागली होती.
पहिल्याच चित्रपटात साकारली होती वृद्धाची भूमिका
'अर्थ' चित्रपटानंतर महेश भट्ट त्यांचा दुसरा चित्रपट 'सारांश' (1984) बनवत होते. ज्यासाठी त्यांनी प्रथम अनुपम खेर यांना वृद्धाच्या भूमिकेसाठी कास्ट केले. या भूमिकेसाठी अनुपम खेर यांनी शूटिंगच्या सहा महिने आधीपासून भूमिकेचा अभ्यास सुरू केला होता. ते धोतर-कुर्ता घालायचे आणि म्हाताऱ्यासारखे काठी घेऊन चालण्याचा सराव करायचे.
शूटिंगच्या 10 दिवस आधी चित्रपटातून काढून टाकले
1 जानेवारी रोजी शूटिंग सुरू होणार होते, परंतु 20 डिसेंबर रोजी त्यांना एका मित्राचा फोन आला की, त्यांना राजश्री प्रोडक्शनच्या 'सारांश' चित्रपटातून वगळण्यात आले आहे. हे ऐकल्यानंतर अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांना फोन केला. तेव्हा महेश भट्ट यांनी त्यांना सांगितले की, त्यांना त्यांच्या चित्रपटात नवोदित अभिनेत्याला कास्ट करायचे नाही, म्हणूनच त्यांनी संजीव कुमारला कास्ट केले आहे.
मुंबई सोडण्याचा घेतला होता निर्णय
या घटनेनंतर अनुपम खेर खूप खचले होते. हा नकार सहन करणे त्यांच्यासाठी खूप कठीण होते. यापूर्वी त्यांना अनेक नकारांचा सामना करावा लागला होता आणि हा चित्रपट त्यांच्यासाठी आशेचा किरण होता. या नकारानंतर त्यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण त्याआधी त्यांना एकदा महेश भट्ट यांना भेटायचे होते.
शापामुळे पुन्हा चित्रपटात काम मिळाले
अनुपम खेर यांनी महेश भट्ट यांची भेट घेतली. महेश भट्ट यांना वाटले की, अनुपम खेर यांनी तो नकार फारसा मनाला लावून घेतला नसावा. पण तसे नव्हते. महेश भट्ट काही बोलण्याआधीच अनुपम खेर यांनी त्यांना म्हटले की, ते मोठी फसवणूक करणारी व्यक्ती आहेत. असे शेवटच्या क्षणी कुणी एखाद्याला चित्रपटातून कसे काय काढू शकते. ते पुढे म्हणाले- मी तुम्हाला ब्राह्मण म्हणून शाप देतो.
अनुपम खेर यांचे हे शब्द ऐकून महेश भट्ट अजिबात रागावले नाहीत, उलट अनुपम खेर यांच्या या बोलण्याने आणि कृतीने ते खूप प्रभावित झाले. त्यानंतर त्यांनी अनुपम खेर यांना पुन्हा चित्रपटात कास्ट केले.
'सारांश'च्या यशानंतर अनुपम खेर यांनी एका आठवड्यात साइन केले होते 57 चित्रपट
अनुपम खेर व्यतिरिक्त महेश भट्ट यांची पत्नी सोनी राजदान, रोहिणी हट्टंगडी आणि आलोक नाथ या कलाकारांच्या 'सारांश'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटाचे बजेट 1 कोटी रुपये होते तर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 6 कोटींची कमाई केली होती. 'सारांश'च्या यशानंतर अनुपम खेर यांनी एका आठवड्यात 57 चित्रपट साइन केले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.