आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'द ताष्कंद फाइल्स'नंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींचा द कश्मीर फाइल्स हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. येत्या 11 मार्च रोजी चित्रपट थिएटरमध्ये दाखल होतोय. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काश्मिरी पंडिताच्या जीवनावर आधारित आहे. 1989 आणि 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर हा चित्रपट भाष्य करतो. सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाचे कथानक आहे.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री म्हणतात, “काश्मीर नरसंहाराची कथा मोठ्या पडद्यावर आणणे सोपे काम नव्हते आणि ते अत्यंत संवेदनशीलतेने हाताळावे लागले. हा चित्रपट डोळे उघडण्याचे वचन देतो आणि प्रतिभावान कलाकारांच्या जोडीने, भारतीय इतिहासातील हा अध्याय वास्तविक कथनाद्वारे दर्शक पुन्हा एकदा पाहू शकतील."
अभिनेत्री पल्लवी जोशी सांगतात, “एक चित्रपट तितकाच उत्तम असतो जितकी त्याची स्क्रिप्ट आणि द काश्मीर फाईल्सच्या सहाय्याने प्रेक्षक पात्रांच्या भावना अनुभवू शकतात आणि सहन करू शकतात ज्यातून ती पात्र गेली आहेत. प्रत्येक कलाकाराने स्वतःला त्या पात्रांमध्ये पूर्णपणे बुडवून घेतले आहे आणि ते ही धक्कादायक आणि दुःखद कथा सांगण्यासाठी वचनबद्ध आहे."
'द कश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले असून झी स्टुडिओज, आय एम बुद्धा आणि अभिषेक अग्रवाल आर्ट्सच्या बॅनरखाली तेज नारायण अग्रवाल, अभिषेक अग्रवाल, पल्लवी जोशी आणि विवेक अग्निहोत्री यांची निर्मिती आहे. पल्लवी जोशी, प्रकाश बेलावडी, अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती तसेच, दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाइक अशा दिग्गजांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.