आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफवा:अनुपम खेर यांनी पत्नी किरणच्या निधनाच्या वृत्ताचे केले खंडन, म्हणाले - ती अगदी ठिक आहे आणि कोरोना लसीचा दुसरा डोसही घेतला आहे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एप्रिलमध्ये समोर आले होते किरण यांना ब्लड कॅन्सर असल्याचे वृत्त

अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या पत्नी आणि भाजपच्या खासदार किरण खेर यांच्या निधनाच्या वृत्ताचे खंडन केले आहे. शुक्रवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी किरण यांची प्रकृती ठिक असून त्यांनी कोरोना लसीचा दुसरा डोसही घेतल्याचे सांगितले आहे. यासोबतच त्यांनी लसीकरण केंद्रावरील फोटोदेखील शेअर केला आहे. किरण खेर या चंदीगढ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना ब्लड कॅन्सरचे निदान झाले होते.

अनुपम खेर यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी लिहिले, ‘सध्या सोशल मीडियावर किरण खेरच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. त्या सर्व चुकीच्या आहेत. तिची प्रकृती ठिक आहे. तसेच किरणने लसीचा दुसरा डोस देखील घेतला आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की अशा नकारात्मक अफवा पसरवू नका. धन्यवाद. सुरक्षित रहा,’ असे अनुपम खरे म्हणाले आहेत.

अनुपम यांच्या संपूर्ण कुटुंबाने घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
किरण खेर यांच्यासह अनुपम आणि त्यांच्या आई दुलारी यांनीदेखील कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ अनुपम यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोसह कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, 'आम्ही सर्वांनी कोरोना व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला आहे. यासाठी सिस्टर एनी, डॉक्टर अफसा आणि नानावटी रुग्णालयाचे आभार. आईने सर्वात शौर्य दाखवले. ओम नमः शिवायचा जप केल्याने मला मदत झाली आणि आशा आहे की किरण, वहिनी रीमा आणि भाऊ राजू यांनाही मदत मिळाली असेल. मास्क घाला, सुरक्षित रहा आणि लसीचा डोस घ्या."

एप्रिलमध्ये समोर आले होते किरण यांना ब्लड कॅन्सर असल्याचे वृत्त
किरण खेर यांना ब्लड कॅन्सर असल्याचे वृत्त 1 एप्रिल रोजी समोर आले होते. अनुपम खेर आणि त्यांचा मुलगा सिकंदर यांनी याविषयी अधिकृत स्टेटमेंट जारी केले होते. ‘माझी पत्नी किरण खेर हिला ब्लड कॅन्सर झाला आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती एक फायटर आहे आणि ती या आजारावर लवकर मात करेन. तिची प्रकृती स्थिर आहे. किरण लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करा’ असे अनुपम यांनी म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...