आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बॉलिवूडमध्ये कोरोना:अनुपम खेर म्हणाले - 'आयसोलेशन वार्डमध्ये दाखल असलेल्या आईला सांगितले नाही की, तिला कोरोना आहे, पण आजुबाजूची परिस्थिती पाहून तिला कळाले आहे'

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुपम खेर यांचे कुटुंब कोरोनाशी झुंज देत आहे. त्यांची आई दुलारी, भाऊ राजू, वहिणी रीमा आणि भाची वृंदा यांना कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. 12 जुलै रोजी अनुपम खेर यांनी इन्स्टाग्रामवर याची माहिती दिली होती. त्यांची आई दुलारी या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल आहे. तर भाऊ, वहिणी आणि भाची या होम क्वारंटाइन आहेत. अनुपम यांनी एक व्हिडिओ शेअर करुन सर्वांचे हेल्थ अपडेट शेअर केले आहे.

अनुपम यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या आईला त्या पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले नाही. त्यांना सांगण्यात आले आहे की त्यांना एक इन्फेक्शन आहे, पण आईला सर्व काही माहिती आहे. आजूबाजूचे वातावरण पाहून तिला कोरोना असल्याचे समजले आहे.

अनुपम यांनी व्हिडिओत म्हटले की, 'घरातील चार सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असतील तर काळजी वाटते. आज थोडे डाऊन फील होतेय. आई स्वतः रुग्णालयात आपले मनोबल वाढवत आहे. तिला अजुनही भूक लागत नाहीये. तिला आयसोलेशन वार्डमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. राजू, रीमा आणि वृंदा होम क्वारंटाइनमध्ये आहेत.'

अनुपम म्हणाले की, 'पालक हे खूप सेल्फलेस असतात. मला झोपेतून उठवण्यासाठी आईचा रोज 7.45 वाजता फोन येतो. पण आज मी 8.30 पर्यंत उठलो नाही तर तिला चिंता वाटली आणि तु ठिक आहेस की नाही अशी विचारणा तिने केली. आपण आपल्या पालकांवर किती प्रेम करतो हे आपण त्यांना बोलून दाखवले पाहिजे. आपल्याला अनेक वेळा वाटते की, भावना व्यक्त करण्याची काहीही गरज नाही. पण आपण आपल्या पालकांना आपण त्यांच्यावर किती प्रेम करतो हे अवश्य सांगायला हवे.'

अनुपम यांनी सांगितले होते - 'अनेक दिवसांपासून आईला भूक लागत नव्हती'

यापूर्वी एका व्हिडिओमध्ये अनुपम खेर म्हणाले होते की, 'गेल्या काही दिवसांपासून माझी आई ज्यांना तुम्ही दुलारी या नावाने ओळखता त्यांना भूक लागत नव्हती. आई काहीच खात नव्हती आणि झोपत होती, तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही आईची ब्लड टेस्ट केली. यामध्ये सर्व काही ठिक निघाले. नंतर डॉक्टरांनी सांगितले की, तुम्ही त्यांना सिटी स्कॅन सेंटरमध्ये घेऊन जा आणि तिथेच यांचे स्कॅन करा. तेव्हा आम्ही स्कॅन केले यामध्ये रिपोर्ट कोविड पॉझिटिव्ह माइल्डली निघाला. मी आणि माझा भाऊ आईसोबत होतो म्हणून आम्ही देखील टेस्ट केली. तेव्हा राजू माइल्डली पॉझिटिव्ह निघाला आणि मी निगेटिव्ह होतो'