आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरची झलक दाखवली आहे. या सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी दिमाखदार सोहळ्याने झाले. या सोहळ्याला मनोरंजन सृष्टीतील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. कल्चरल सेंटरचा इनसाइड व्हिडिओ शेअर करत अनुपम खेर यांनी सांगितले की, या सांस्कृतिक केंद्रात पोहोचणारे ते पहिले पाहुणे आहेत.
व्हिडिओमध्ये ऑडिटोरिअमचा आतील नजारा दाखवताना अनुपम खेर म्हणाले, जगातील कोणत्याही सांस्कृतिक केंद्राशी याची स्पर्धा होऊ शकते. खरं तर हे त्यापेक्षा खूप सुंदर आहे, असे मी म्हणेन.
उद्घाटन समारंभाला अनुपम खेर हे पहिले पाहुणे म्हणून पोहोचले
व्हिडिओ शेअर करताना अनुपम खेर यांनी लिहिले, "नीता आणि मुकेश अंबानी यांनी मुंबईत अतिशय देखणे सांस्कृतिक केंद्र बनवले आहे. हे निःसंशयपणे जगातील सर्वोत्तम कल्चरल सेंटर आहे. या नवीन सभागृहात प्रवेश करणारा मी पहिला पाहुणा आहे आणि मला अभिमान वाटतो की मी येथे पहिला पाहुणा म्हणून आलोय. माझा मित्र फिरोज अब्बास खान याने येथे सादर होणाऱ्या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले आहे. जय हो..!"
ओपनिंग सेरेमनीमध्ये जमली बॉलिवूड सेलेब्सची मांदियाळी
या कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाला बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. दीपिका पदुकोण-रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा-निक जोनास, गिगी हदीद, सैफ अली खान, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा, करीना कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, सलमान खान, गौरी खान, सुहाना खान, आर्यन खान यासह अनेक सेलिब्रिटी येथे पोहोचले होते.
कल्चरल सेंटरमध्ये 2000 आसनांचे भव्य नाट्यगृह
नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये परफॉर्मिंग आर्ट्ससाठी तीन स्वतंत्र जागा आहेत. केंद्रात 2000 आसनांचे ग्रँड थिएटर आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत 250 आसनांचे स्टुडिओ थिएटर आणि 12S डायनॅमिक सीट क्यूब आहे. या केंद्रात खास व्हिज्युअल आर्टसाठी बनवलेले चार मजली आर्ट हाऊसही आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.