आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेते अनुपम खेर स्टारर 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आता घसरण होताना दिसत आहे. दुस-या आठवड्यात रविवारी बॉक्स ऑफिसवर तब्बल 26.20 कोटींची कमाई केल्यानंतर चित्रपटाने सोमवारी मात्र 12.40 कोटी आणि मंगळवारी 10.25 कोटींची कमाई केली आहे. विवेक रंजन अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडतो. 11 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 12 दिवसांत सुमारे 190 कोटींचा व्यवसाय केला आहे. व्यापार विश्लेषकांच्या मते, हा चित्रपट येत्या 1-2 दिवसांत 200 कोटींचा टप्पा पार करेल.
तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले की, चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या पाचव्या दिवशी म्हणजेच 12व्या दिवशी (मंगळवार) भारतात बॉक्स ऑफिसवर 10.25 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. याआधी या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्याच्या चौथ्या दिवशी (सोमवार) 12.40 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी (रविवार) 26.20 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी (शनिवार) 24.80 कोटी रुपये आणि पहिल्या दिवशी (शुक्रवार) 19.15 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. त्याआधी या चित्रपटाने भारतात 7 दिवसांत म्हणजेच पहिल्या आठवड्यात 97.30 कोटींची कमाई केली होती. या अर्थाने, चित्रपटाने 12 दिवसांत आतापर्यंत भारतात 190.10 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
सहसा रिलीजच्या दुस-या आठवड्यात चित्रपटांच्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण झाल्याचे दिसून येते, परंतु 'द कश्मीर फाइल्स' त्याला अपवाद ठरला आहे. अवघ्या 12 कोटींच्या निर्मिती खर्चात तयार झालेला 'द कश्मीर फाइल्स' हा बॉलिवूडचा असा पहिला चित्रपट आहे, ज्याच्या कमाईत सातत्याने एवढी तेजी पाहायला मिळतेय. इतकेच नाही तर पहिल्या दिवशी या चित्रपटाला देशभरात केवळ 600 स्क्रीन्स मिळाल्या. पण, नंतर चित्रपटाची क्रेझ बघून स्क्रीन काउंट 600 वरून 2000 करण्यात आला. दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीपासून चित्रपटाचा स्क्रीन काउंट 4000 पर्यंत वाढवण्यात आल्याचे सांगितले जाते.
या चित्रपटात अनुपम खेर व्यतिरिक्त मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी यांच्यासह अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. 'द काश्मीर फाइल्स' मध्ये 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार आणि त्यांच्या पलायनावर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिषेक अग्रवाल यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.