आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन डायरी:अनुपम खेर यांनी लता मंगेशकर यांच्याशी केली फोनवर चर्चा, सोशल मीडियावर शेअर केला अनुभव

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्याचे मूळ रेकॉर्डिंग देखील अनुपम खेर यांनी शेअर केली आहे.

लॉकडाऊनचे पालन करणारे अनुपम खेर यांनी ट्विटरवरील त्यांच्या 'कॉल पीपली हू मेक यू हॅपी' या खास सीरिजअंतर्गत गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याशी फोनवर चर्चा केली. खेर यांनी या संभाषणाचा अनुभव ट्विटरवर शेअर केला आहे. त्यासोबत लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्याचे मूळ रेकॉर्डिंग देखील शेअर केली आहे.

ट्विटमध्ये अनुपम यांनी लिहिले की, "माझ्या 'कॉल पीपल हू मेक यू हॅपी' या सीरिजअंतर्गत मी लता मंगेशकर यांना फोन लावला.  लताजींनी सर्व भारतीयांना आशीर्वाद दिला आहे. आयुष्यभराची भेट म्हणून मला त्यांनी काही व्हिडिओ पाठवले आहेत. यात माझ्या आवडत्या गाण्याचे मूळ रेकॉर्डिंग आहे जे आशा आणि विश्वासाबद्दल आहे. आज ज्याची सर्वात जास्त गरज आहे."

यापूर्वी गुरुवारी अनुपम यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ते कवी शांती स्वरूप मिश्रा यांच्या कवितांचे पठण करीत होते. अनुपम यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते की, त्यांना या ओळी खूप आवडल्या आणि ते प्रेरणादायकही वाटल्या. त्यांनी आपल्या चाहत्यांना ते ऐकण्याचे आणि शेअर करण्याचे आवाहन केले होते.

मौजूदा माहोल में #शांतीस्वरूपमिश्र जी की ये पंक्तियाँ मुझे बहुत अच्छी भी लगी और प्रेरणात्मक भी। आप भी सुनिए और शेयर करिए। 🙏😍🌈 #lockdown #stayhome #optimism pic.twitter.com/o9DXUdMcaZ

— Anupam Kher (@AnupamPKher) April 16, 2020 

बातम्या आणखी आहेत...