आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा विळखा:अनुपम खेर यांची आई कोरोना पॉझिटिव्ह, भाऊ-वहिनी आणि पुतणीत सौम्य लक्षणे दिसल्यानंतर स्वतःला केले क्वारंटाइन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुपम खेर यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह
Advertisement
Advertisement

कोरोना विषाणूने आता बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींच्या घरातही शिरकाव केला आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यानंतर अभिनेता अनुपम खेर यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अनुपम खेर यांची आई दुलारी देवी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. अनुपम खेर यांनी स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत ही माहिती दिली. सोबतच्या त्यांचा भाऊ, वहिणी आणि पुतणी यांच्यातही कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत. यानंतर अनुपम यांनी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. 

अनुपम यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिले की, "मी तुम्हाला सांगतो की, माझी आई दुलारी देवी कोरोना पॉझिटिव्ह (सौम्य लक्षणे) आढळली आहे. आम्ही त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले आहे. माझा भाऊ, वहिणी आणि पुतणी यांच्यातही सावधगिरी बाळगल्यानंतरही सौम्य लक्षणे आढळली. मी स्वतःची चाचणी केली होती आणि माझी चाचणी निगेटीव्ह आली. मी याबाबत बीएमसीला सुचना दिली आहे."

Advertisement
0