आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आणखी एक सोशल मीडिया वॉर:अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांच्यात जुंपली, अनिल म्हणाले - 'माझी गाडी 40 वर्षे चालली तरी तुझी अजून गॅरेजमधूनच बाहेर पडली नाही'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुराग कश्यप आणि अनिल कपूर यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगलेलं पाहायला मिळालं.

सोशल मीडियावर फक्त ट्रोलर्सच नव्हे तर सेलिब्रिटीही एकमेकांना चांगलेच धारेवर धरताना दिसतात. दिलजीत दोसांज आणि कंगना रनोट यांच्यातील शाब्दिक चकमक संपत नाही तोच आता अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांच्यातही सोशल मीडियावर चांगलीच जुंपली आहे. आगामी जुग जुग जियो या चित्रपटातील कलाकारांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अनिल कपूर सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. त्यामुळे सध्या ते आपला जास्तीत जास्त वेळ सोशल मीडियावर घालवत आहेत.

  • असे सुरु झाले अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांच्यातील सोशल वॉर

सध्या सोशल मीडियावर अनुराग आणि अनिलमध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलेले पाहायला मिळत आहे. झाले असे की, ‘दिल धडकने दो’ मधील आपली सहकारी शेफाली शहाचे दिल्ली क्राइम या वेब सीरिजला एमी पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक करणारी पोस्ट अनिल कपूर यांनी शेअर केली. अनिल कपूरच्या याच पोस्टवर अनुराग कश्यपने अनिल यांच्यावर निशाणा साधला. यानंतर अनिल कपूरने यांनी अनुरागला उत्तर देताना कुठलीही कसर ठेवली नाही. दिल्ली क्राइम सीरिजच्या टीमचे कौतुक करत अनिल कपूर म्हणाले, 'तुम्ही डिझर्व्ह करता, चांगले वाटते जेव्हा लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळते.' यावर अनुराग कश्यपने म्हटले, 'मलाही चांगले वाटते जेव्हा काही चांगल्या लोकांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव होते. बाय द वे, आपला ऑस्कर कुठे आहे, ओ सॉरी नामांकन.' असे म्हणत अनुरागने अनिल कपूरवर निशाणा साधला.

अनिल यांना अनुरागची तिरकस कमेंट आवडली नाही. 'तुम्ही तर ऑस्करच्या जवळ तेव्हा आला होतात जेव्हा आपण टीव्हीवर स्लमडॉग मिलियनेयरला ऑस्कर जिंकताना पाहिले. जाऊ द्या… तुम्हाला नाही जमणार', असे जोरदार प्रत्युत्तर अनिल कपूर यांनी दिले. अनुराग-अनिल कपूर यांच्यातील हे सोशल मीडिया वॉर येथे थांबले नाही. पुढे अनुरागने अनिल कपूर यांना पुन्हा डिवचले. 'तुम्ही तर स्लमडॉग मिलियनेयरसाठी सेकंड चॉईस होतात ना? शाहरुख खानला कास्ट करण्याची तयारी होती.'

अनुराग म्हणाला- तुम्हाला केसांच्या बळावरच चित्रपटांमध्ये काम मिळते

यावर अनिल कपूर यांनी अनुरागला सुनावले. 'राहू द्या तुमच्याप्रमाणे मला काम शोधायला लागत नाही. तसंच केसही वाकडे करावे लागत नाही'. अनिल यांच्या या पोस्टनंतर अनुरागने म्हटले, 'सर आपण केसांच्या बाबतीत तर बोलूच नका. तुम्हाला तर तुमच्या केसांच्या बळावरच चित्रपटांमध्ये काम मिळते.'

अनिल यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'बेटा, माझ्यासारखे करिअर करण्यासाठी सीरियस स्किल्सची गरज असते, गेल्या 40 वर्षांपासून माझी गाडी अशीच सुरु नाहीये.' यावर उत्तर देताना अनुरागने त्यांच्या काही चित्रपटांचे पोस्टर्स शेअर करुन म्हटले, 'सर प्रत्येक 40 वर्षे जुनी गाडी ही विंजेट नसते. काहींना खटारादेखील म्हटले जाते. निवृत्तीची वेळ जवळ आली आहे.'

  • अनिल यांनीही पिच्छा सोडला नाही

अनिल यांनीही अनुरागचा पिच्छा सहजासहजी सोडला नाही. ते म्हणाले, 'अरे माझी गाडी 40 वर्षांपासून सुरु तरी आहे, तुझी तर अद्याप गॅरेज बाहेरच पडली नाही.' हे वॉर संपवताना अनिल कपूर यांनी लिहिले, 'मी यामुळे खूप दु:खी आहे की तुमच्याबरोबर एक फिल्म करण्याचा निर्णय घेतला पण चिंता करु नका. शेवटी मीच हसणार आहे.'

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser