आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर एक्सक्लूझिव्ह:दोन राज्यांच्या आयटी अधिका-यांनी अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या मालमत्तेवर धाडी टाकल्या, आता ईडीच्या कारवाईचीही टांगती तलवार

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी काय झाले?

आयकर विभागाने बुधवारी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू आणि चित्रपट निर्माता विकास बहल यांच्या मालमत्तेवर छापे मारले. हे तिघेही बॉलिवूड सेलिब्रिटीज वेळोवेळी सरकारविरोधात बोलत होते. त्यांनी नव्या कृषी कायद्यांविरुद्ध सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनालाही पाठिंबा दिलेला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग कश्यप आणि तापसी पन्नू यांच्या मालमत्तेवर दोन राज्यांच्या आयकर विभागाच्या अधिका-यांनी छापे मारले होते. यापैकी तीन अधिकारी हे यूपीतून आले होते, तर तीन महाराष्ट्र झोनचे होते. दरम्यान अनुराग आणि तापसी यांच्या घरांवर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) चेही छापे येऊ शकतात, अशी चर्चा आहे.

आक्षेपार्ह वस्तू आढळल्या नाहीत

अनुराग आणि तापसीकडून अधिका-यांना आक्षेपार्ह गोष्टी मिळाल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान दोघांचेही लॅपटॉप आणि काही हार्ड ड्राईव्ह जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्या दोघांचे व्हॉट्सअॅप चॅट्सचा तपशीलही तपासला जाईल. ज्यांची त्यांच्या चित्रपटात गुंतवणूक आहे त्यांची चौकशीही केली जाईल. जे अनुराग कश्यपचे हितचिंतक आहेत, त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे. गुरुवारी अधिकारी अनुराग आणि तापसी यांच्याशी चर्चा करणार आहेत.

बुधवारी काय झाले?

आयकर विभागाने अनुराग कश्यप, तापसी पन्नू आणि विकास बहल यांच्या मालमत्तेवर छापे टाकले होते. फँटम फिल्म्स, त्याचे माजी भागीदार मधू मंटेना आणि रिलायन्स एंटरटेनमेंट ग्रुपचे सीईओ शिबाशिष सरकार यांच्या जागांवरही छापे मारले. फँटम फिल्म्सची स्थापना अनुराग, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी, मंटेना आणि यूटीव्ही स्पॉटबॉयचे हेड विकास बहल यांनी 2011 मध्ये केली होती. ही कंपनी 2018 मध्ये भंग करण्यात आली होती. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी पुण्यात अनुराग आणि तापसीचीही चौकशी केली.

किती ठिकाणी झाली छापेमारी?
मुंबईतील लोखंडवाला, अंधेरी, वांद्रा आणि पुण्यात बुधवारी सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान कारवाईला सुरुवात झाली. मुंबई आणि पुण्यातील 30 मालमत्तांवर धाडी घातल्या गेल्या. यात अनुराग कश्यप
आणि तापसी पन्नू यांच्या मुंबईस्थित घरांचा समावेश आहे.

कारवाईचे कारण काय?
आतापर्यंत आयटी विभागाच्या अधिकार्‍यांकडून कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आले नाही, परंतु फँटम फिल्म्स कंपनीच्या कामकाजात व व्यवहारात त्रुटी आढळल्याचा संशय आहे. छाप्यात
सापडलेल्या कागदपत्रे आणि पुरावे यांच्या आधारे तपासाची व्याप्ती वाढू शकते.

बातम्या आणखी आहेत...