आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनुरागच्या पाठिशी त्याच्या पुर्वाश्रमीच्या पत्नी:पहिली पत्नी आरती बजाज म्हणाली - तू रॉकस्टार आहे;  दुसरी पत्नी कल्कि म्हणते- तू घटस्फोटानंतरही माझा सन्मान राखला

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या दोघींनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनुरागचे समर्थन केले आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपवर पायल घोष नावाच्या अभिनेत्रीने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. त्याच्याविरोधात पायल पोलिसांत तक्रारदेखील दाखल करणार असल्याचे वृत्त आहे. हे प्रकरण 2014 चे असल्याचे तिचे म्हणणे आहे. अनुरागने विवस्त्र होऊन आपल्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पायलने केला आहे. अनुरागने मात्र त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान काहींनी अनुरागवर टीका केली तर काही मात्र त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे दिसून येत आहे.

मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष, राधिका आपटे, तापसी पन्नू, रिचा चड्ढा या अनुरागच्या समर्थनार्थ पुढे आल्या. आता अनुरागच्या पुर्वाश्रमीच्या पत्नी आरती बजाज आणि कल्कि कोचलिन या देखील त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. 2003 मध्ये अनुरागचे लग्न आरती बजाजसोबत झाले होते, तर 2009 मध्ये दोघे विभक्त झाले. त्यानंतर 2011 मध्ये अनुरागने अभिनेत्री कल्कि कोचलिनसोबत दुसरे लग्न केले. मात्र 2015 मध्ये हे नातेदेखील संपुष्टात आले. या दोघींनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनुरागचे समर्थन केले आहे.

  • काय म्हणाली अभिनेत्री कल्कि कोचलिन?

ट्रोल्स tho ट्रॉल करेंगें म्हणत कल्किने लिहले, "प्रिय अनुराग. ही सोशल मीडियाची सर्कस तुझ्यापर्यंत येऊ देऊ नकोस. तू नेहमी आपल्या चित्रपटांच्या स्क्रिप्ट्समधून महिलांच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आहे. तू खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यातही महिलांचा सन्मान राखला आहे. मी याची साक्षीदार आहे. कारण तू मला नेहमी खासगी आणि कामात आपल्या बरोबरीची, समान जागा दिलीस. तू घटस्फोटानंतरही माझा सन्मान राखला, माझ्यासाठी नेहमी हजर होतास," असे कल्कि म्हणाली आहे.

ती पुढे लिहिते, 'ही वेळ खूप विचित्र आहे. प्रत्येक जण एकमेकांवर खोटे आरोप करतोय. कुटुंबं, मित्र आणि देश उद्धवस्त करत आहेत. मात्र या व्हर्चुअल रक्तरंजित संघर्षाशिवाय एक जग आहे, जिथे गौरव महत्त्वाचा आहे. यावेळी तुला मजबूत राहण्याची गरज आहे आणि तू जे काम करत आहेस ते करत राहा', असे म्हणत कल्कि अनुरागच्या पाठिशी खंबीरपणे उभी दिसत आहे.

दुसरीकडे रविवारी अनुरागची पहिली पत्नी आरती बजाजने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत अनुराग कश्यपला पाठिंबा दर्शवला होता. 'तू रॉकस्टार असून महिला सबलीकरणासाठी करतोस ते काम करत राहा. जर प्रत्येकाने आपली एनर्जी योग्य ठिकाणी वापरली तर जग एक सुंदर जागा होईल,' असे तिने म्हटले आहे.

  • एवढी वर्षे का गप्प राहिली पायल घोष?

अनुरागने माझा लैंगिक छळ केला, तसंच अभद्र भाषेचाही वापर केला, असा आरोप पायल घोषने केला आहे. इतके दिवस गप्प राहण्याबद्दल पायल म्हणाली, "मी काय करू मला काहीच समजत नव्हते. माझ्या मित्रांनी मला सांगितले, पोलिसात तक्रार कर पण मी नाही केली. मी खूप वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र माझ्या कुटुंबाने आणि जवळच्या मित्रांनी मला गप्प राहायला सांगितले. त्यांना माझ्या भविष्याची चिंता होती. मीटू कॅम्पेन सुरू झाल्यानंतरही माझे कुटुंब, मॅनेसजरसह इंडस्ट्रीतील अनेकांनी मला गप्प राहण्यासाठी सांगितले. कारण यामुळे माझे करिअर उद्ध्वस्त होईल, अशी भीती त्यांना वाटत होती."

  • अनुराग कश्यपने आरोप फेटाळून लावले

अनुराग कश्यपने पायल घोषचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतके खोटे बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतले. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असे ट्विट अनुराग कश्यपने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...