आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचा आरोप:दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन अनुराग कश्यपविरोधात विक्रोळी पोलिसात गुन्हा दाखल, अटकेची टांगती तलवार

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीडिता एक दाक्षिणात्य अभिनेत्री असून तिचा आरोप आहे की, चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने एकदा तिचा लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला होता.
  • रविवारी भाजप खासदार रवी किशन यांनी संसदेत या मुद्द्यावर कठोर कायदा तयार करण्याची मागणी केली होती.

दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेल्या पीडितेच्या तक्रारीनंतर बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता अनुरागवर अटकेची टांगती तलवार आहे. पीडितेने मंगळवारी अनुरागविरोधात मुंबईतील विक्रोळी पोलिसांत तक्रार दाखल केली.

महत्त्वाची बाब म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस आजच अनुराग कश्यपला अटक करण्याची शक्यता आहे. पीडिता यापूर्वी सोमवारी मुंबईतील ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला पोहोचली होती. मात्र उशीरा रात्री दोन वाजेपर्यंत पोलिस स्टेशनमध्ये थांबल्यानंतरही तिची तक्रार नोंदवली गेली नव्हती.

पीडित अभिनेत्रीने मंगळवारी तिचे वकील नितीन सातपुते यांच्यासह पोलिस स्टेशन गाठत अनुरागच्या अटकेची मागणी केली. ‘अनुराग कश्यपवर बलात्काराच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी, सोमवारी रात्री अभिनेत्री पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी दाखल झाली होती. मात्र महिला पोलीस अधिकारी नसल्यामुळे ती तक्रार नोंदवू शकली नव्हती’, अशी माहिती तिचे वकील नितीन सातपुते यांनी यावेळी दिली.

अनुरागविरोधात बलात्कार, गैरवर्तन, चुकीच्या उद्देशाने रोखणे, आणि महिलेचा अपमान केल्याबद्दल भांदवी कलम यू / एस 376 (1), 354, 341, 342 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • अभिनेत्रीचे आरोप

पीडित अभिनेत्रीने अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. अनुरागने माझ्यासोबत अतिप्रसंग केला असून तो माझ्याशी अतिशय वाईट वागला, असे तिने आपल्या आरोपात म्हटले आहे. यानंतर तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटमध्ये टॅग करत आपल्याला सुरक्षा पुरवण्याची मागणी केली होती. विक्रोळी पोलिस लवकरच या प्रकरणी अनुराग कश्यपला चौकशीसाठी बोलावू शकतात. त्याच्याविरोधात ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे, त्यावरुन त्याला अटक होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही.

  • संसदेत गाजले होते प्रकरण

रविवारी रात्री एक वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज सुरु होते. यावेळी गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी संसदेत अनुराग कश्यपचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी अनुराग कश्यपच्या नावाचा उल्लेख न करता त्याला 'दरिंदा' म्हटले होते. ते म्हणाले होते की, देशातील आमच्या मुली दुर्गा देवीसारख्या पूज्यनीय आहेत. पण बॉलिवूडमधील काही लोक त्यांचे नशीब उजळविण्याचा दावा करुन त्यांच्याशी सौदेबाजी करतात. रवी किशन यांनी यावेळी यासंदर्भात कडक कायदा करण्याची मागणी केली होती. जेणेकरुन असे कृत्य करणा-यांना कायद्याची भीती वाटेल. दोन दिवसांपूर्वीच रवी किशन यांनी अनुराग कश्यपवर गांजाचे सेवन केल्याचा आरोप केला होता.

काय आहेत पीडित अभिनेत्रीचे आरोप?

  • अनुरागने माझा लैंगिक छळ केला, तसेच अभद्र भाषेचाही वापर केला, असा आरोप करत एका मुलाखतीत पीडितेने आपबिती कथन केली. तिने सांगितल्यानुसार, "मी अनुराग यांना भेटायला त्यांच्या यारी रोड इथल्या ऑफिसमध्ये गेली होती. ते दुसऱ्या कुणाशी तरी बोलत होते म्हणून मी परत आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला आणि बोलावले. काही ग्लॅमरस घालू नको असे त्यांनी सांगितले. म्हणून मी सलवार कमीज घालून त्यांना भेटायला गेले. त्यावेळी त्यांनी माझ्यासाठी जेवण बनवले, आमचे जेवण झाल्यानंतर त्यांनी माझी जेवणाची प्लेटही उचलली. त्यानंतर मी तिथून निघून आले. त्यांनी मला पुन्हा मेसेज करून बोलावले. मात्र तेव्हा खूप उशीर झाला होता म्हणून मी त्यांना भेटायला नाही येऊ शकत असे सांगितले." यानंतर दोन-तीन दिवसांनी मी अनुराग यांना पुन्हा भेटले, यावेळी मी त्यांच्या घरी गेले होते, असे पीडितेने सांगितले.
  • अभिनेत्री म्हणाली, "त्यांनी मला घरी बोलावले होते. ते स्मोकिंग करत होते, मी तिथे बसले होते. त्यानंतर अनुराग यांनी मला अडल्ट फिल्म दाखवली, तेव्हा मी खूप घाबरले. अचानक ते माझ्यासमोर न्यूड झाले आणि मलादेखील माझे कपडे काढायला सांगितले. मी त्यांना म्हटले मला कन्फर्टेबल वाटत नाहीये, यावर ते मी ज्या अभिनेत्रींसह काम केले आहे, त्या फक्त एका कॉलवर माझ्याकडे येण्यासाठी तयार आहेत, असे अनुराग मला म्हणाले. मी पुन्हा त्यांना सांगितले, मला अस्वस्थ वाटतंय. काही तरी करून मी तिथून कसाबसा पळ काढला.
  • त्यानंतर मी त्यांना कधीच भेटले नाही. त्यांनी अनेकदा मला भेटायला बोलावले. मात्र आजपर्यंत मी ती घटना विसरू शकले नाही, मला त्याचा आजही त्रास होतो, असे अभिनेत्री म्हणाली.

अनुराग कश्यपने आरोप फेटाळले

अनुराग कश्यपने अभिनेत्रीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतके खोटे बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतले. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असे ट्विट अनुराग कश्यपने केले होते. या प्रकरणानंतर अनुरागच्या समर्थनार्थ त्याच्या पुर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नीसह अनेक अभिनेत्री पुढे आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...