आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Anurag Kashyap Gets Furious After Seeing Kangana Replacing People In Films And Now Putting Allegation In Other, In Response, The Actress Called Him Anti Nation And Mini Mahesh Bhatt

वादात बॉलिवूड:अनुराग कश्यपने साधला कंगनावर निशाणा, म्हणाला - 'एकेकाळी माझी चांगली मैत्रीण होती, पण आता या नव्या कंगनाला मी ओळखत नाही' 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना रनोट मुलाखतींमध्ये आपले रोखठोक मत व्यक्त करत आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्य़े मोठे खुलासे करणारी अभिनेत्री कंगना रनोट सध्या बरीच चर्चेत आहे. अलीकडेच तिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक बड्या नावांवर निशाणा साधला आहे. कंगनाने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत करण जोहर, महेश भट्ट, आदित्य चोप्रा, जावेद अख्तर यांच्यासह अनेक सेलेब्सना सुसाइड गँग असे म्हटले. इतकेच नाही तर स्वरा भास्कर आणि तापसी पन्नू यांचा बी ग्रेड अभिनेत्री असा उल्लेख केला. या वादग्रस्त मुलाखतीनंतर एकेकाळी तिचा चांगला मित्र राहिलेल्या अनुराग कश्यपने तिच्यावर रोष व्यक्त केला आहे. अनुरागने कंगनाच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर करुन कंगना प्रसिद्धीसाठी काहीही बोलतेय असे म्हटले आहे. 

  • एकेकाळी माझी चांगली मैत्रीण होती कंगना : अनुराग कश्यप 

अनुरागने ट्विटरवर कंगनाने मणिकर्णिका या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तिने रोल कट करण्याचा निर्णय दिग्दर्शकाचा असल्याचे सांगितले होते. खरं तर मणिकर्णिका हा चित्रपट कंगनाने स्वतः दिग्दर्शित केला होता. व्हिडिओ शेअर करुन अनुरागने ट्विट केले, “काल कंगनाची एक मुलाखत पाहिली. कधी काळी ती माझी खुप चांगली मैत्रीण होती. माझा प्रत्येक चित्रपट बघून मला प्रोत्साहन द्यायची. पण या नव्या कंगनाला मी ओळखत नाही. तिची मुलाखत पाहून मला धक्काच बसला.” 

पुढच्या ट्विटमध्ये अनुरागने लिहिले, “आपल्या सर्व दिग्दर्शकांना जी शिवीगाळ करते, जी एडिटमध्ये बसून आपल्या सहकलाकारांच्या भूमिका कमी करते, सर्व दिग्दर्शक जे एकेकाळी कंगनाचे कौतुक करायचे आज तिच्यासोबत काम करण्यास नकार देतात. खंर तर कंगनाच्या फॉलोअर्सने तिला आरसा दाखवायला हवा त्याऐवजी ते तिला डोक्यावर घेऊन नाचत आहेत. ती आता काहीही बोलतेय. तिच्या बोलण्यामध्ये काहीही तथ्य नाही. याचा शेवट इथेच होणार. खऱ्या कंगनाला मी ओळखतो त्यामुळे या नव्या कंगनाकडे मला आता पाहवत नाही.” अशा आशयाचे ट्विट करुन अनुरागने कंगनावर निशाणा साधला आहे.  

कुणी बोलो अथवा न बोलो, मी बोलणार कंगना. खूप झाले. जर तुझ्या घरच्यांना आणि तुझ्या मित्रांनासुद्धा हे दिसत नसेल, तर आज तुझे कुणीही नाही आणि प्रत्येकजण तुझा वापर करतोय. बाकी तुझी मर्जी... मला जी शिवीगाळ करायची तर कर... असेही अनुरागने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

अनुराग कश्यपच्या या ट्विटनंतर कंगनाने देखील त्याला प्रत्युत्तर देताना लिहिले, 'हा आहे मिनी महेश भट्ट, जो कंगनाला एकटी आणि खोट्या लोकांमध्ये अडकलेली असल्याचे सांगतोय. यासारख्या राष्ट्रीय, शहरी नक्षलवादी जे दहशतवाद्यांना वाचवत होते, आता ते चित्रपट माफियांना वाचवत आहेत', असे कंगना म्हणाली आहे.  

2019 मध्ये कंगना रनोट दिग्दर्शित 'मणिकर्णिका' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बनवताना कंगना या चित्रपटातील इतर कलाकारांच्या भूमिका कापत असल्याचा आरोप अनेकांनी तिच्यावर केला होता. सोनू सूददेखील या चित्रपटाचा एक भाग होता पण महिनाभराच्या शुटिंगनंतर त्याने हा चित्रपट सोडला होता.  कंगनाने बर्‍याच लोकांना या चित्रपटाचे श्रेयदेखील दिले नव्हते, अशीदेखील चर्चा होती. यासंदर्भात ती म्हणाली होती की, चित्रपटाचे निर्णय घेणे हे दिग्दर्शकाचे काम आहे आणि इतरांनी यात हस्तक्षेप करू नये. दुसरीकडे, कंगना आता इतर सेलिब्रिटींवरही असेच आरोप लावत आहे.