आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चित्रपट निर्माता-दिग्दर्शगक अनुराग कश्यपने लॉकडाऊनच्या मोकळ्या वेळेचा फायदा घेऊन डान्स शिकला आहे. त्याची मुलगी आलिया कश्यपने त्याला नृत्याचे धडे दिले आहेत. अलीकडेच स्वत: आलियाने टिकटॉकवर याची एक झलक दाखविली आहे.
आलियाने शेअर केलेल्या लेटेस्ट टिकटॉक व्हिडीओजमध्ये तिचे वडील अनुरागसुद्धा तिच्यासोबत ताल धरताना दिसले. अनुरागने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मुलगी आलियाला टॅग करुन लिहिले, "मुलगी या सर्व गोष्टी माझ्याकडून करुन घेत असते."
View this post on Instagram#Anuragkashyap #AaliyahKashyap #Bollywood #Entertainment #bollywoodcinema
A post shared by Entertainment Fan Page (@facc2911) on Jun 8, 2020 at 9:14am PDT
आलिया अनुरागच्या पहिल्या पत्नीची मुलगी: 19 वर्षीय आलिया अनुराग आणि त्याची पहिली पत्नी आरती बजाजची मुलगी आहे. श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर तिची बेस्ट फ्रेंड आहे. दोघीही एकाच शाळेत सोबत शिकल्या.
आरती आणि अनुरागचे 1997 मध्ये लग्न झाले होते आणि दोघांचा 2009 मध्ये घटस्फोट झाला होता. नंतर अनुरागने अभिनेत्री कल्की कोचलिन (2011) बरोबर लग्न केले. पण हे लग्नही फार काळ टिकले नाही आणि 2015 मध्ये हे दोघे विभक्त झाले.
अनुराग 26 वर्षीय शुभ्राला डेट करतोय : 47 वर्षीय अनुराग त्याच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असलेल्या शुभ्रा शेट्टीला डेट करत असल्याच्या बातम्या गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत आहेत. 27 वर्षीय शुभ्राने 2014 मध्ये मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले. सध्या ती अनुरागची प्रॉडक्शन कंपनी फँटम फिल्म्समध्ये काम करत आहे.
शुभ्राने अनुराग कश्यप दिग्दर्शित अलीकडेच प्रदर्शित झालेल्या चॉक्ड या वेबसीरीजची स्क्रिप्टही लिहिली आहे. एका मुलाखतीत अनुरागने म्हटले की, शुभ्राचे आभार मानण्यासाठी त्याने ही वेब सीरिज तयार केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.