आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी झाले चिमुकलीचे आगमन:अनुषा दांडेकर बनली 'सहारा'ची आई, सोशल मीडियावरून दिली माहिती

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चाहते देत आहेत अनुषाला शुभेच्छा

VJ आणि मॉडेल अनुषा दांडेकरने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अनुषाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती एका चिमुकलीसोबत खेळताना दिसत आहे. अनुषाने तिच्या पोस्टद्वारे सांगितले आहे की, ती एका छोट्या परीची आई झाली आहे. यासोबतच तिने तिच्या मुलीच्या नावाचाही खुलासा केला आहे.

अनुषाने फोटोसोबत दिले प्रेमळ कॅप्शन
मुलीसोबतचा फोटो शेअर करत अनुषाने लिहिले, "अखेर माझ्याजवळ माझी छोटी परी आली आहे. ती माझी आहे.. मी तुम्हा सर्वांना माझ्या आयुष्यातील प्रेम असलेली माझी एंजल 'सहारा'ची ओळख करून देत आहे. ती माझ्या आयुष्याचे प्रेम आहे. मी तुझी खूप काळजी घेईल, तुझे सर्व संकटांपासून नेहमी रक्षण करेल. माझ्या बाळा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.. तुझीच आई," अशा शब्दांत अनुषाने तिच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

चाहते देत आहेत अनुषाला शुभेच्छा
चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण अनुषावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अनुषाच्या पोस्टवर एका चाहत्याने लिहिले, 'हे ऐकून खूप आनंद झाला.' आणखी एक चाहता म्हणाला, 'खूप क्यूट. तुझ्या छोट्या राजकुमारीला प्रेम आणि आशीर्वाद.'

करण कुंद्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती अनुषा

अनुषाबद्दल बोलायचे झाले तर ती तिच्या लव्ह लाईफ आणि करण कुंद्रासोबतच्या ब्रेकअपमुळे देखील चर्चेत आहे. गेल्यावर्षी दोघांनी ब्रेकअपची घोषणा केली होती. अनुषाच्या सोशल मीडिया पोस्टवरूनदेखील दोघे विभक्त झाल्याचे संकेत मिळाले होते.

बातम्या आणखी आहेत...