आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराटच्या वाढदिवशी अनुष्काने शेअर केले अनसीन फोटो:फनी अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, यूजर्स म्हणाले- पत्नी असावी तर अशी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिकेटचा बादशाह विराट कोहली आज 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा पाऊस पाडत आहेत. दरम्यान, विराटची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही त्याला वाढदिवसाच्या हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. विराटचे कधीही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करत अनुष्काने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराटचे हे अनसीन फोटोज सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

फोटोंमध्ये दिसला विराटचा मजेशीर अंदाज

विराटच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काने त्याचे एकूण 4 फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये फक्त विराटचा चेहरा दिसत आहे, ज्यामध्ये तो खूप मजेशीर एक्सप्रेशन देताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये किंग कोहलीने टी-शर्ट आणि डेनिम शॉर्ट्ससह ब्राउन टोपी घातली आहे. त्याने एका हातात बॅग धरली आहे आणि दुसऱ्या हातात त्याची चप्पल आहे. फोटोतील विराटचे एक्सप्रेशन खूपच क्यूट आहेत. तिसऱ्या फोटोतही विराटचा फक्त चेहरा दिसत आहे, ज्यामध्ये तो कॅमेऱ्याकडे मजेदार अँगलने पाहत आहे. अनुष्काने शेअर केलेला विराटचा शेवटचा फोटो सर्वात खास आहे, ज्यामध्ये तो त्याची लेक वामिकासोबत दिसतोय. चाहत्यांना विराटचे हे चारही फोटो खूप आवडले आहेत.

अनुष्काने भावनिक कॅप्शन लिहिले

फोटोंव्यतिरिक्त अनुष्काने एका इमोशनल कॅप्शनसह किंग कोहलीवरचे आपले प्रेम व्यक्त केले आहे. अनुष्काने लिहिले- 'माझे प्रेम, आज तुझा वाढदिवस आहे, म्हणून तुझे हे काही उत्तम फोटो मी पोस्ट केले आहेत. पोस्टच्या माध्यमातून मी तुला सांगू इच्छितो की, माझे तुझ्या प्रत्येक रुपावर प्रेम आहे. तुला खूप सारे प्रेम,' असे अनुष्का म्हणाली आहे.

अनुष्काच्या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला

अनुष्काच्या या पोस्टवर तिचे आणि विराटचे चाहते भरभरून प्रेम करत आहेत. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले - 'व्वा बायको असावी तर अशी.' आणखी एका युजरने लिहिले - 'फक्त एक पत्नीच असे फोटो शेअर करू शकते.' अनुष्काच्या या पोस्टवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा पाऊस पडला आहे. बॉलिवूड इंडस्ट्री आणि क्रीडा जगतापासून ते कोहलीच्या चाहत्यांपर्यंत सर्वांना त्याचे हे फोटो खूप आवडले आहेत.

बातम्या आणखी आहेत...