आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आनंदाची बातमी:अनुष्का शर्मा आणि विराट कोहलली कन्यारत्न, विराट म्हणाला - आमचं हे सौभाग्य आहे की आम्हाला आयुष्यात ही गोष्ट अनुभवता आली

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुष्का आणि बाळाची प्रकृती उत्तम आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली आईबाबा झाले आहेत. त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सोमवारी दुपारी अनुष्काने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोमवारी सकाळीच अनुष्का रुग्णालयात दाखल झाली होती. विराटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

'आम्हाला दोघांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांसाठी आम्ही खूप आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघीसुद्धा ठीक आहेत आणि आमचं हे सौभाग्य आहे की आम्हाला आयुष्यात ही गोष्ट अनुभवता आली. यावेळी आम्हाला थोडी प्रायव्हसी हवी असेल हे तुम्ही नक्कीच समजू शकता असं आम्ही समजतो,'' अशा आशयाची पोस्ट विराटने शेअर केली आहे .

ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. ‘जानेवारी 2021 पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता.

बाळाच्या जन्माच्या चार महिन्यांनी कामावर परतणार अनुष्का
अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे ती शेवटची मोठ्या पडद्यावर 'झिरो' या चित्रपटात दिसली होती. यात तिच्यासह शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा झालेली नाही. बाळाच्या जन्माच्या चार महिन्यांनी ती कामावर परतणार आहे. निर्माती म्हणून अनुष्काची 'पाताल लोक' ही वेब सीरिज बरीच गाजली होती. याशिवाय तिने 'बुलबुल' या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट 24 जून 2020 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.

बातम्या आणखी आहेत...