कोरोनाव्हायरस : अनुष्का शर्माने जगभरातील आपल्या फॅन क्लब्सना दिला एक संदेश, म्हणाली - आशा आहे की प्रत्येकजण घरातच असेल 

  • अनुष्काचे फॅन क्लब भारतासोबत अनेक देशांमध्ये आहे.

दिव्य मराठी वेब टीम

Mar 25,2020 06:03:00 PM IST

बॉलिवूड डेस्क. अभिनेत्री अनुष्का शर्माने जगभरातील आपल्या चाहत्यांना कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे. तिने वेगवेगळ्या देशांमधील तिच्या फॅन क्लबच्या नावी एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने आशा व्यक्त केली की, तिचे सर्व चाहते घरातच असतील.

  • अनुष्काने लिहिले- सर्व लोक सुरक्षित राहा

अनुष्काने पोस्टमध्ये लिहिले आहे, "इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर भारत आणि जगातील माझ्या सर्व फॅन क्लबना प्रेम आणि शुभेच्छा. आशा आहे की आपण सर्व घरातच असाल. प्रत्येकजण सुरक्षित असेल."

विशेष म्हणजे, अनुष्काचे फॅन क्लब भारतासोबत अनेक देशांमध्ये पसरलेले असून या सर्व देशात कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाला आहे. यामध्ये ब्राझील, पेरू, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, जर्मनी, दुबई, सौदी अरेबिया, अबू धाबी, इंडोनेशिया, थायलंड आणि अफगाणिस्तान या देशांचा समावेश आहे.

X