आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे 'काला' फेम तृप्ती डिमरीसोबतचा त्याचा नवा फोटो. नववर्षाच्या निमित्ताने अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने कर्णेश शर्मासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. यानंतर हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे तृप्ती अनुष्काच्या प्रोडक्शन हाऊसच्या चित्रपटात झळकली आहे. आता ती लवकरच अनुष्काची वहिनी होणार असल्याचे म्हटले जात आहे.
तृप्ती डिमरीने कर्णेश शर्मासोबतचा एक फोटो केला शेअर
नवीन वर्षाच्या निमित्ताने तृप्ती डिमरीने कर्णेशसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले- 'माझे प्रेम.' फोटोमध्ये ती कर्णेश शर्माला मिठी मारताना दिसत आहे. जेव्हापासून तृप्तीची पोस्ट समोर आली आहे, तेव्हापासून हे दोघे प्रेमात असल्याचा दावा चाहते करत आहेत. मात्र, आतापर्यंत दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत काहीही सांगितलेले नाही.
कोण आहे तृप्ती डिमरी?
तृप्ती ही बॉलिवूडमधील नवोदित अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 2017 मध्ये 'पोस्टर बॉईज' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. याशिवाय ती 'काला', 'बुलबुल' आणि 'लैला मजनू' या नेटफ्लिक्स चित्रपटांचा भाग आहे. विशेष म्हणजे 'बुलबुल' आणि 'काला' या दोन्ही चित्रपटांची निर्मिती कर्णेशचे प्रोडक्शन हाऊस क्लीन स्लेट फिल्म्स अंतर्गत झाली आहे.
कर्णेश कोण आहे?
कर्णेश शर्मा हा अभिनेत्री अनुष्का शर्माचा मोठा भाऊ आणि प्रसिद्ध निर्माता आहे. अनुष्काने त्याच्यासोबत मिळून क्लीन स्लेट फिल्म्स हे प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. मात्र, काही वर्षांनी अनुष्काने प्रोडक्शन हाऊसची सर्व जबाबदारी भावाकडे सोपवली. कर्णेशने निर्माता म्हणून त्याच्या कारकिर्दीला 'NH 10' या चित्रपटाद्वारे सुरुवात केली, या चित्रपटात त्याची बहीण अनुष्का मुख्य अभिनेत्री होती. याशिवाय त्याने 'बुलबुल', 'काला', 'फिल्लौरी', 'परी' आणि 'पाताल लोक' ही प्रसिद्ध वेब सिरीज बनवली आहे. अनुष्काचा पुढील चित्रपट 'चकदा एक्सप्रेस' तिचा भाऊ कर्णेश प्रोड्यूस करत आहे.
निर्माता होण्यापूर्वी क्रिकेटर आणि मर्चंट नेव्हीमध्ये होता कर्णेश
वृत्तांनुसार, निर्माता होण्यापूर्वी कर्णश शर्मा मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होता. शिवाय कर्णेश कर्नाटकच्या अंडर-19 संघामध्येही सहभागी झाला होता. कर्णेश आणि तृप्ती अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचे समजते. 2020 च्या सुरुवातीला कर्णेशने तृप्तीसोबतचे काही रोमँटिक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.