आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडिया:चिखलाने माखलेले शूज स्वच्छ करताना दिसला विराट कोहली, पत्नी अनुष्का फोटो शेअर करुन म्हणाली...

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री अनुष्का शर्माने विराट कोहलीचा शूज स्वच्छ करतानाचा एक फोटो चाहत्यांसोबत शेअर केला असून तो सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा याकाळात आपला प्रेग्नेंसीचा काळ एन्जॉय करत आहे. सध्या ती पती विराट कोहलीसोबत आयपीएलच्या निमित्ताने यूएई येथे आहे. येथून ती विराट आणि स्वतःची बरीच छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत आहे. अलीकडेच तिने विराट कोहलीचा एक फोटो आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. या छायाचित्रात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार त्याचे चिखलाने माखलेले शूज एका टूथ ब्रशच्या मदतीने स्वच्छ करताना दिसतोय.

हा फोटो शेअर करुन अनुष्का शर्माने लिहिले, "दौ-यापूर्वी आपले चिखलाने माखलेले शूज अतिशय मग्न होऊन स्वच्छ करताना मी माझ्या नव-याला पकडले आहे." या फोटोत विराट टीशर्ट आणि चष्मा लावून दिसतोय.

अनुष्का आणि विराट लवकरच आईवडील होणार असून पुढील वर्षी जानेवारी महिन्यात त्यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...