आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरुष्काचे शेजारी झाले कॅट-विकी:शुभेच्छांसह अनुष्का म्हणाली -  तुम्ही तुमच्या नवीन घरात गृहप्रवेश करा, आता आम्हाला कंस्ट्रक्शनचा आवाज ऐकायला मिळणार नाही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुष्काने सोशल मीडिया पोस्टमध्ये विकी आणि कतरिनाच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्माने बॉलिवूडचे नवविवाहित दाम्पत्य विकी कौशल आणि कतरिना कैफला यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अनुष्काच्या या शुभेच्छांसह कतरिना आणि विकी आता तिचे शेजारी होणार असल्याचेही सांगितले आहे. अनुष्काशिवाय आलिया भट्ट, करीना कपूर आणि प्रियांका चोप्रा यांनीही कतरिना आणि विकी यांना लग्नाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुष्काने सोशल मीडिया पोस्टमध्ये विकी आणि कतरिनाच्या लग्नाचा फोटो शेअर केला आहे. यासह अनुष्का म्हणाली, “तुम्हाला दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्ही दोघे आयुष्य भर एकत्र रहा, तुमच्यात कायम प्रेम राहो. याचा ही आनंद आहे की अखेर तुमचे लग्न झाले आणि तुम्ही तुमच्या नवीन घरात गृहप्रवेश कराल आणि आता आम्हाला कंस्ट्रक्शनचा आवाज ऐकायला मिळणार नाही.”

विकीने शोधला नवीन आशियाना
लग्नाआधीच विकी कौशल नवीन घराच्या शोधात होता. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर त्याने जुहूमध्ये एक आलिशान अपार्टमेंट घेतले. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे घरही याच इमारतीत आहे.

रिअल इस्टेट ओनर वरुण सिंह यांनी काही मीडिया हाऊसला सांगितले होते की, विकीने हे अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे आणि त्यासाठी मोठी रक्कम दिली आहे. विकीने इमारतीमधील आठवा मजला भाड्याने घेतला असून 36 महिन्यांसाठी 1.75 कोटी रक्कम अॅडव्हान्स म्हणून दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...