आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा लवकरच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. तिला नववा महिना सुरु आहे. गरोदरपणात स्वतःला फिट ठेवण्यासाठी अनुष्का वर्कआउट आणि योगाला पसंती देतेय. मंगळवारी तिने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती ट्रेडमिलवर जॉगिंग करताना दिसतेय. या बूमरँग व्हिडिओत अनुष्काने व्हाइट टी-शर्ट आणि ब्लॅक जेगिंग परिधान केले आहे. व्हिडिओत तिचे बेबी बंपही दिसत आहे.
यापूर्वी अनुष्काने योगा करतानाचा एक फोटो शेअर केला होता. यात ती पती विराट कोहलीच्या मदतीने शीर्षासन करताना दिसली होती. गरोदरपणात अनुष्काने अनेक फोटोशूटदेखील केले. त्याचे फोटोदेखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.
बाळाच्या जन्माच्या चार महिन्यांनी कामावर परतणार अनुष्का
अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे ती शेवटची मोठ्या पडद्यावर झिरो या चित्रपटात दिसली होती. यात तिच्यासह शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा झालेली नाही. बाळाच्या जन्माच्या चार महिन्यांनी ती कामावर परतणार आहे. निर्माती म्हणून अनुष्काची 'पाताल लोक' ही वेब सीरिज बरीच गाजली होती. याशिवाय तिने 'बुलबुल' या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट 24 जून 2020 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.