आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट ज्या कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर त्याच्यावरच भडकली अनुष्का:म्हणाली- माझ्या परवानगीशिवाय तुम्ही माझे फोटो कसे वापरले?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एका आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स ब्रँडवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. अनुष्काने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या ब्रँडला खडेबोल सुनावले आहेत. एका ब्रँडने अनुष्काच्या परवानगीशिवाय तिचे फोटो पब्लिसिटीसाठी वापरले आहेत. माझ्या परवानगीशिवाय तुम्ही माझे फोटो कसे वापरले, असा जाब तिने या ब्रँडला विचारला आहे. इतकेच नाही तर लवकरात लवकर ते फोटो डिलीट करण्याची ताकीद अनुष्काने त्यांना दिली आहे. विशेष म्हणजे अनुष्काने ज्या स्पोर्ट्स ब्रँडवर संताप व्यक्त केला आहे, त्याच कंपनीचा विराट कोहली ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

अनुष्काने लगेच फोटो काढण्यास सांगितले
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनुष्काने लिहिले, “मी तुमच्या ब्रँडची अम्बॅसडर नसल्याने माझे कोणतेही फोटो जाहिरातीसाठी पोस्ट करण्याआधी तुम्ही माझी परवानगी घ्यायला हवी, हे तुम्हाला ठाऊक असेलच. कृपया ती पोस्ट हटवा." अनुष्काने रागाचे इमोजी टाकत ही तक्रार केली आहे. अनुष्काचा पती आणि क्रिकेटर विराट कोहली याने मात्र ही पोस्ट लाइक केल्याचं आढळून आलं आहे.

विराट कोहलीनेही हे प्रकरण सोडवण्यास सांगितले
अनुष्काने ज्या स्पोर्ट्स कंपनीवर नाराजी व्यक्त केली आहे योगायोगाने तिचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर तिचा नवरा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आहे. मजेची बाब म्हणजे विराटने अनुष्काची ही पोस्ट लाईक केली आहे. याशिवाय अनुष्काची पोस्ट रिपोस्ट करत त्याने स्पोर्ट्स कंपनीला हे प्रकरण सोडवण्यास सांगितले आहे.

मार्केटिंग स्ट्रॅटेजीचा असू शकतो भाग
सोशल मीडियावर काही नेटक-यांना ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी वाटतेय. त्यांच्या मते, हे संपूर्ण प्रकरण स्क्रिप्टेड आहे आणि त्यात तथ्य नाही.

2017 मध्ये झाले होते अनुष्का आणि विराटचे लग्न
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे 2017 मध्ये लग्न झाले होते. दोघांनी लग्नापूर्वी तीन वर्षे एकमेकांना डेट केले होते. 2021 मध्ये अनुष्का-विराटची मुलगी मुलगी वामिकाला जन्म झाला. आई झाल्यानंतर अनुष्काने काही काळासाठी चित्रपटांपासून ब्रेक घेतला होता. आता ती लवकरच कमबॅक करतेय. लवकरच 'चकदा एक्सप्रेस' या चित्रपटात ती झळकणार आहे.

'चकदा एक्सप्रेस' हा चित्रपट भारताची माजी महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी हिच्या जीवनावर आधारित आहे. याशिवाय याचवर्षी डिसेंबरमध्ये अनुष्का आणि विराटने लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा केला आहे. दोघांनीही खूप मजेशीर पद्धतीने एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...