आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊन फन:अनुष्का शर्माने केली विराटच्या फॅन्सची नकल, टपोरीच्या अंदाजात म्हणाली - 'ए कोली चौका मार ना चौका'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुष्काचा हा अंदाज बघून विराट कोहलीने विचित्र प्रतिक्रिया दिली.

लॉकडाऊनमुळे अनुष्का आणि विराट एकमेकांचे निवांत वेळ घालवत आहेत. ब-याच दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेल्या विराट कोहलीला आपल्या चाहत्यांची आठवण येत असावी म्हणून अनुष्काने चक्क त्याच्या चाहत्यांचे अनुकरण केले आहे. या दरम्यान विराट कोहलीची विचित्र प्रतिक्रियाही पाहायला मिळाली.

अनुष्का शर्माने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती विराटची फॅन म्हणून दिसली आहे. त्यात ती विराटला टपोरी अंदाजात म्हणतेय, 'ऐ कोली, कोली चौका मार न चौका, क्या कर रहे है, चौका मार'.

या मजेदार व्हिडिओसह अनुष्का लिहिले, 'मला वाटलं की तो फिल्डला मिस करतोय. येथे प्रेमाने लाखो चाहते त्याला भेटत असतात. विराटला नक्कीच त्याच्या चाहत्यांची आठवण येत असेल म्हणून मी त्याला हा अनुभव दिला आहे.' 

  • कार्तिक आर्यनदेखील विराट कोहलीचा चाहता आहे

अनुष्काच्या या व्हिडिओवर कमेंट करताना कार्तिक आर्यनने लिहिले की, 'मी असाच एक चाहता आहे'. याशिवाय अर्जुन कपूर, दिया मिर्झा, करण जोहर, काजल अग्रवाल आणि जरीन खान यांनीही त्यांच्या मजेदार कमेंट्स दिल्या आहेत. अनुष्का विराटचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर गाजतोय. 

बातम्या आणखी आहेत...