आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेग्नेंसीत शीर्षासन:प्रेग्नेंट अनुष्का शर्माने पती विराट कोहलीच्या मदतीने केले शीर्षासन, फोटो शेअर करुन म्हणाली - योगा हा माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिला पती विराट कोहली मदत करताना दिसतोय.

अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या प्रेग्नेंसीचा काळ एन्जॉय करत आहे. या दिवसांत स्वतःला फिट ठेवण्यासाठी ती योगा करत आहे. मंगळवारी तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यात ती शीर्षासन करताना दिसत आहे. यासाठी तिला पती विराट कोहली मदत करताना दिसतोय.

सर्वात कठीण आसनांपैकी एक
अनुष्काने फोटो शेअर करत लिहिले, ‘हा हात खाली पाय वर करण्याचा सगळ्यात कठीण व्यायाम आहे. योगा हा माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग आहे. माझ्या डॉक्टरांनी देखील मला सांगितले की, मी जास्त ताण पडणारी किंवा जास्त वाकायला लागणार नाही, अशी सर्व आसने करू शकते. परंतु, योग्य त्या सगळ्या सावधानीसहच. मी अनेक वर्षांपासून शीर्षासन करतेय. भिंत मी आधार म्हणून वापरली आहे. तर, माझा खंबीर पती मला संतुलन साधण्यास आणि अधिक सुरक्षेसाठी मदत करतो आहे. माझ्या गरोदरपणातही मी योगासनं करू शकते याचा मला खूप आनंद आहे.’’ बेबी बंपसोबत अनुष्काने केलेला हा शीर्षासन सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेचा विषय ठरतोय.

अखेरची 'झिरो' मध्ये दिसली होती अनुष्का
अनुष्काच्या कामाबद्दल सांगायचे म्हणजे, ती शेवटची 'झिरो' या चित्रपटात अभिनेता शाहरुख खानसोबत झळकली होती. निर्माती म्हणून तिची 'पाताल लोक' ही वेब सीरिज लोकांच्या पसंतीस पडली होती. याशिवाय तिने 'बुलबुल' या सिनेमाची देखील निर्मिती केली होती. हा चित्रपट 24 जून रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser