आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काची भन्नाट पोस्ट:थ्रोबॅक फोटो शेअर करुन अनुष्का शर्मा म्हणाली -  'आता मी असं बसू शकत नाही पण खाऊ नक्की शकते’

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुष्काच्या या फोटोला अडीच दशलक्षांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माती अनुष्का शर्मा लवकरच आई होणार आहे. सध्या ती आपला गरोदरपणाचा काळ एन्जॉय करत आहे. सोशल मीडियावर देखील ती गरोदरपणातील या दिवसांचा आनंद घेतानाची छायाचित्रे शेअर करत आहे. मात्र नुकताच तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक जुना फोटो पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे तिने या फोटोला दिलेले कॅप्शन सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अनुष्काने शेअर केलेल्या फोटोत ती एका खुर्चीवर दोन्ही पाय पोटाजवळ घेऊन आनंदाने खाताना दिसतेय. ‘जेव्हा मी अशाप्रकारे बसू शकत होती आणि खाऊही शकत होती. पण आता मी असं बसू शकत नाही पण खाऊ नक्की शकते’, असे गमतीशीर कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. तिच्या या फोटोला अडीच दशलक्षांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

अनुष्का जानेवारी 2021 मध्ये बाळाला जन्म देणार आहे. ऑगस्ट 2020 मध्ये अनुष्का आणि विराट कोहलीने सोशल मीडियावर त्यांच्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची गोड बातमी आपल्या चाहत्यांना दिली होती. प्रेग्नेंसीचा हा काळ एन्जॉय करतानाच अनुष्का आपल्या फिटनेसकडेही तितकेच लक्ष देत आहे.

बातम्या आणखी आहेत...