आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 33 वर्षे पूर्ण केली आहेत. तिचा जन्म 1 मे 1988 रोजी अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे झाला. तिचे वडील कर्नल अजय कुमार शर्मा हे निवृत्त लष्करी अधिकारी आणि आई आशिमा शर्मा गृहिणी आहेत. अनुष्काला एक मोठा भाऊ असून त्याचे नाव कर्नेश आहे. अनुष्काने तिचे शालेय शिक्षण आर्मी स्कूल मधून पूर्ण केले आणि माउंट कार्मेल कॉलेज (बंगळुरू) मधून पदवीचे शिक्षण घेतले.
मॉडेलिंगद्वारे झाली करिअरला सुरुवात
शिक्षण पूर्ण केल्यानंतर अनुष्का मुंबईत आली आणि येथे तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. 2007 मध्ये तिला मॉडेलिंगचा पहिला ब्रेक मिळाला. यावेळी तिने लेक्मे फॅशन वीकमध्ये वेंडेल रॉड्रिक्ससाठी मॉडेलिंग केली होती. 2008 मध्ये तिने आदित्य चोप्रांच्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच चित्रपटात तिला शाहरुख खानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि अनुष्काने मागे वळून पाहिले नाही. 'बँड बाजा बारात', 'जब तक है जान' आणि 'पीके' अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. 'एनएच 10' या चित्रपटाद्वारे ती निर्मातीदेखील बनली आहे. तिचा शेवटचा चित्रपट ‘झिरो’ हा होता. 2018 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
चर्चेत राहिली लव्ह लाइफ
बॉलिवूडमध्ये पदार्पण झाल्यानंतर अनुष्काचे नाव 'बँड बाजा बारात' चित्रपटातील तिचा को-स्टार रणवीर सिंगशी जोडले गेले होते, पण लवकरच ते दोघे वेगळे झाले. यानंतर अनुष्का भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला डेट करत असल्याने चर्चेत आली होती. 2017 मध्ये या दोघांनी इटलीमधील टस्कनी येथे अतिशय गुप्तपणे लग्न केले. त्यांनी अचानक लग्न करून सर्वांना चकित केले. विराटने सांगितले होते की, अनुष्काने लग्नाचे संपूर्ण नियोजन केले होते आणि लग्नाला गुप्त ठेवण्यासाठी बनावट आयडी आणि नावे वापरली होती.
विराटला उद्धट समजली होती अनुष्का
एका मुलाखतीत विराटने सांगितले होते की, अनुष्कासोबत त्यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान झाली होती. अनुष्काला भेटण्यापूर्वी विराट बराच घाबरला होता. जेव्हा अनुष्का त्याच्या समोर आली, तेव्हा तिला पाहून तो स्तब्ध झाला. अनुष्काची उंची जास्त होती, हे पाहून.. तुला याहून उंच हिल्स नाही मिळाले का? अशी कमेंट विराटने केली. हे ऐकून अनुष्का संतापून विराटला म्हणाली, एक्सक्यूज मी? त्यानंतर विराटला आपली चूक लक्षात आली. मस्करी करण्याच्या नादात आपण चुकीचं बोलल्याची जाणीव त्याला झाली.
तसे पाहता, दोघांची पहिली भेट काही विशेष नव्हती, त्यानंतर अनुष्काने विराटला तिच्या नवीन घराच्या पुजेच्या निमित्ताने आमंत्रित केले होते. येथूनच दोघांची मैत्री सुरू झाली जी हळूहळू प्रेमात बदलली. हे दोघेही याचवर्षी एका गोंडस मुलीचे आईबाबा झाले आहेत. वामिका असे त्यांच्या लाडक्या लेकीचे नाव आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.