आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काचे प्राणीप्रेम:प्राण्यांसाठी निवारागृह उभारणार अनुष्का शर्मा, पुढील वर्षीपर्यंत होणार तयार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुष्का प्राण्यांसाठी हक्काचे घर बनवण्यावर काम करत आहे.

प्राणिप्रेमी अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमी प्राण्यांच्या हक्कासाठी बोलत असते. प्राण्यांवरील गैरवर्तनाबद्दल भारतातील विद्यमान कायदे बदलण्यासाठी आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षा अंमलात आणण्यासाठी तिने सातत्याने आवाज उठवला आहे. त्यामुळेच आता ती प्राण्यांसाठी हक्काचे घर बनवण्यावर काम करत आहे.

अनुष्का बऱ्याच काळापासून मुंबईच्या बाहेर प्राण्यांसाठी निवारा उघडण्याची योजना आखत आहे. यावर तिने कामही सुरू केले आहे. अनुष्का अॅनिमल शेल्टर होम पुढच्या वर्षी सुरू करणार असल्याची चर्चा आहे. कोरोनामुळे सर्व काम थांबले होते मात्र आता निवारा बनवण्याचे काम सुरू झाले आहे. खरं तर, अनुष्का भारतात वेगळे आणि अाधुनिक सुविधा असणारे शेल्टर होम बनवत आहे.

बाळाच्या जन्माच्या चार महिन्यांनी कामावर परतणार अनुष्का अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे दोन वर्षांपूर्वी तिचा 'झीरो' चित्रपट आला होता. यात तिच्यासह शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा झालेली नाही. यावर्षी जानेवारी महिन्यात अनुष्काच्या मुलीचा जन्म झाला. बाळाच्या जन्माच्या चार महिन्यांनी ती कामावर परतणार आहे. निर्माती म्हणून अनुष्काची 'पाताल लोक' ही वेब सीरिज बरीच गाजली होती. याशिवाय तिने 'बुलबुल' या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट 24 जून 2020 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.

बातम्या आणखी आहेत...