आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Anushka Sharma, Virat Kohli Are 'truly Amazed' As COVID 19 Fundraiser The Fundraiser They Started For COVID 19 Relief Surpassed The Target

'विरुष्का'ने गोळा केला विक्रमी निधी:कोविड रुग्णांसाठी 7 दिवसांत जमवायचा होता 7 कोटींचा निधी, 11 कोटींपेक्षा अधिकची रक्कम झाली जमा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • केटो या संस्थेच्या माध्यमातून विराट आणि अनुष्का यांनी हे लक्ष्य ठेवले होते.

कोरोनाच्या दुस-या लाटेत गरजुंसाठी अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांनी निधी गोळा करण्याचे आव्हान केले होते. या दोघांनी 7 दिवसांत 7 कोटी रुपयांचा निधी उभा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. नंतर त्यांनी हे लक्ष्य 7 कोटींहून 11 कोटीचे केले होते. केटो या संस्थेच्या माध्यमातून विराट आणि अनुष्का यांनी हे लक्ष्य ठेवले होते. यात स्वत: त्यांनी दोन कोटींचा निधी दिला होता. त्यानंतर देश विदेशातील अनेक व्यक्ती आणि संस्थांनी यात सहाय्य केले होते.

विशेष म्हणजे विराट आणि अनुष्का यांनी नव्याने ठेवलेले 11 कोटींचे लक्ष्य देखील पार झाले आहे. ॉॉॉएकुण 11, 39, 11, 820 रुपयांचा विक्रमी निधी जमा झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विराट आणि अनुष्का यांनी मदत करणा-यांचे आभार व्यक्त केले आहेत.

आपण सर्वांनी दाखवलेली एकता बघून आश्चर्य वाटले: अनुष्का

अनुष्काने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, "तुम्ही सर्वांनी दाखवलेली एकता पाहून मी चकित झाले. सुरुवातीच्या उद्दीष्टापेक्षा आम्ही जास्त निधी उभारला आहे आणि त्यामुळे लोकांचे जीवन वाचविण्यात खूपच मदत होईल. तुमच्या सर्वांच्या मदतीशिवाय हे शक्य झाले नसते," असे अनुष्का म्हणाली आहे.

7 मे रोजी सुरु केली होती मोहिम
अनुष्का आणि विराट यांनी 7 मे रोजी #InThisTogether ही मोहिम सुरु केली होती. त्यात त्यांनी स्वत: 2 कोटी रुपये दिले होते. हा जमा झालेला निधी कोविड रुग्णांच्या मदतीसाठी दिला जाणार आहे.

12 मे रोजी वाढवले होते लक्ष्य
12 मे रोजी अनुष्का आणि विराट यांनी आपले लक्ष्य 7 कोटींहून 11 कोटी केले होते. या मदत निधीत एमपीएल स्पोटर्स फाउंडेशनने पाच कोटी इतकी रक्कम दिली. त्यामुळे सात कोटींचे लक्ष्य सहजपणे पार झाले. 'कोरोना विरुद्धच्या लढाईत पाच कोटीची मदत दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद. यासह या मदत निधीचे लक्ष्य 11 कोटी इतके करण्यात येत आहे. तुम्ही सर्वांनी केलेल्या मदतीसाठी मी आणि अनुष्का आभार व्यक्त करतो,' असे विराटने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...