आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली 11 जानेवारी रोजी आईबाबा झाले. मुंबईच्या ब्रीच कॅण्डी इस्पितळात अनुष्काने सोमवारी दुपारी मुलीला जन्म दिला. विराटने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यातून आपल्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. अनुष्का आणि बाळाची प्रकृती चांगली असून सध्या त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर केला जावा, अशी विनंती विराटने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना केली.
आता बातमी आहे की, विराटने जवळच्या नातेवाईकांनाही अनुष्का आणि बाळाला इस्पितळात भेटण्याची परवानगी दिलेली नाही. सोबतच विराट आणि अनुष्काने इस्पितळातून कोणाकडूनही फुलं किंवा भेटवस्तू न घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड वातावरणात दोघांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
कोणीही फोटो काढू नये याची सक्त ताकीद
एवढेच नाही तर इस्पितळातील कर्मचार्यांना फोटो न काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इस्पितळातील सुरक्षा देखील आधीपेक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. जे लोक आजूबाजूच्या रूम्समध्ये दाखल आहेत त्यांना भेटायला येणाऱ्यांना आणि इतर कर्मचाऱ्यांना मुलीची झलक दिसू नये याची खास सोय करण्यात आली आहे. इस्पितळाच्या बाहेर छायाचित्रकारांची असलेली गर्दी पाहून अनुष्का आणि मुलीला मागच्या दाराने घरी पाठविण्याचा विचार केला जात असल्याचेही म्हटले जात आहे.
विराटने लग्नातही नातेवाईकांना केले नव्हते आमंत्रित
जवळच्या नातेवाईंकाना अनुष्का आणि बाळाला भेटू न देण्याचा निर्णय विराटने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र लग्नातदेखील विराटने आपल्या नातेवाईकांना आमंत्रित केले नव्हते. 11 डिसेंबर 2017 रोजी विराट आणि अनुष्का यांनी इटलीत लग्न केले होते. त्यावेळी मध्यप्रदेशच्या कटनी येथे राहणाऱ्या विराटच्या काकू आशा कोहली यांनी सांगितल्याप्रमाणे, विराटने त्यांना किंवा त्यांच्या कुठल्याही नातेवाइकाला निमंत्रम पाठवले नव्हते. माध्यमांवरच त्याच्या लग्नाच्या चर्चा ऐकल्याचे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.
विराटचे एमपी कनेक्शन
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दिल्ली नाही, तर मूळचा मध्यप्रदेशचा आहे. फाळणीच्या वेळी विराटचे आजोबा पाकिस्तानातून कटनी येथे शिफ्ट झाले. यानंतर कामानिमित्त विराटचे वडील दिल्लीत राहायला गेले. तरी आजही विराटचे काका आणि काकूंसह मोठे कुटुंब कटनी येथेच राहते. 2005 मध्ये विराट आपल्या चुलत भावाच्या निधनानंतर कटनीला गेला होता. तेव्हापासून तो कटनीला एकदाही गेलेला नाही. विराटच्या काकू माजी महापौर असून विराटचे चुलत भाऊ आणि वहिनी सुद्धा राजकारणात सक्रीय आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.