आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#InThisTogether:अनुष्का शर्मा-विराट कोहलीचे कोविड पीडितांसाठी 7 कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य, एका दिवसातच 3.6 कोटींचा निधी झाला जमा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुष्काने मानले देणगीदारांचे आभार

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे देशात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे यासारख्या अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. या कठीण काळात बॉलिवूडचे अनेक कलाकार पुढे येऊन मदतीचा हात देत आहेत. दरम्यान, अनुष्का शर्मा आणि तिचा पती विराट कोहलीने यांनीही 7 दिवसांसाठी क्राऊड फंडिंग सुरू केली आहे. या जोडप्याने #InThisTogether मोहिमेसाठी स्वतः 2 कोटींची देणगी देऊन 7 कोटींचा निधीजमा करण्याचे लक्ष्य ठेवले होते. आनंदाची गोष्ट म्हणजे अवघ्या 24 तासांत 7 कोटींपैकी अर्धी रक्कम जमा झाली आहे.

देणगीदारांचे आभार
अनुष्का शर्माने 3.6 कोटी रुपयांचा निधी जमा झाल्यानंतर देणगी देणार्‍यांचे आभार मानले आहेत. अनुष्काने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, "आतापर्यंत देणगी देणा-या सर्वांची मी आभारी आहे. आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद. आपण अर्धा मार्ग पार केला आहे, चला पुढे जाऊया. #InThisTogether.' असे कॅप्शन अनुष्काने दिले आहे.

ऑक्सिजन आणि वैद्यकीय उपकरण खरेदी केले जातील
अनुष्का आणि विराट यांनी किट्टो या क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या सहयोगाने #InThisTogethe ही मोहिम सुरु केली आहे. सात दिवस ही मोहिम चालवली जाईल. यातून जमा झालेला निधी ACT ग्रांट्सकडे सोपवला जाईल. हा निधी ऑक्सिजन, वैद्यकीय उपकरणे आणि लसीकरणाच्या सुविधा पुरवण्यासाठी वापरला जाईल.

सोशल मीडियावर पोस्ट केला होता व्हिडिओ
अनुष्काने सोशल मीडिया अकाउंटवर विराट कोहलीसोबतचा एक व्हिडीओ शेअर करत मोहिमेबद्दलची माहिती दिली होती. हा व्हिडीओ शेअर करत तिने म्हटले होते, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपला देश लढा देत आहे. आपल्या आरोग्य यंत्रणेला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आपल्या लोकांच्या समस्या पाहून मला दु:ख झाले. त्यामुळे गरजूंना मदत करण्यासाठी मी आणि विराटने #InThisTogether ही मोहिम सुरु केली आहे.’

बातम्या आणखी आहेत...