आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावनिक:पाळीव डॉग ब्रूनोच्या मृत्यूमुळे दु: खी विराट-अनुष्काने लिहिले, 'तू 11 वर्षांत आमच्याशी आयुष्यभराचे नाते बनवले'

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनुष्का आणि विराटने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ब्रुनोच्या मृत्यूची बातमी शेअर केली.

अनुष्का शर्मा आणि तिचा नवरा विराट कोहली त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या मृत्यूमुळे दु: खी आहेत. या कुत्र्याचे नाव ब्रूनो होते, जो बीगल प्रजातीचा होता. बुधवारी अनुष्का आणि विराटने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ब्रुनोच्या मृत्यूची बातमी शेअर केली.

अनुष्का-विराटने एक भावनिक संदेश लिहिला: अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये ब्रुनोचे एक छायाचित्र शेअर करुन देव तुझ्या आत्म्याला शांती देवो अशी प्रार्थना केली. तर विराटनेही   लिहिले की, तुझा आत्मा शांती लाभो ब्रूनो. तू 11 वर्षे आमचे जीवन प्रकाशित केले आणि आयुष्यभराचे नाते बनवले. तू आज एका चांगल्या ठिकाणी निघून गेला. विराटने  अनेकदा ब्रुनोसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

याशिवाय त्याच्याकडे डुड नावाचा लॅब्राडोर प्रजातीचाही कुत्रा आहे. अलीकडेच, डूडबरोबरचे एक छायाचित्र शेअर करताना अनुष्काने कोरोनाव्हायरसशी झगडत असलेल्या जगाविषयी लिहिले होते, हे दाट ढगही निघून जातील.  

बातम्या आणखी आहेत...