आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्ट मॅटर्निटी:मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच घराबाहेर दिसली अनुष्का शर्मा, बाळाची झलक मात्र दिसली नाही

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विराट आणि अनुष्का आपल्या बाळाला डॉक्टरांकडे तपासणीसाठी घेऊन आले होते.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांच्या घरी 11 जानेवारी रोजी चिमुकलीचे आगमन झाले आहे. बाळाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच विराट आणि अनुष्का मीडियाच्या कॅमे-याच कैद झाले. गुरुवारी मुंबईच्या वांद्रेमध्ये विराट आणि अनुष्का आपल्या बाळाला डॉक्टरांकडे तपासणीसाठी घेऊन आले होते.

यावेळी अनुष्का निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्समध्ये दिसली. तिने सोबत पांढऱ्या रंगाचा मास्क घातला होता. तर विराटने काळ्या रंगाचा शर्टसह पँट घातली होती. मात्र, यावेळी त्यांच्या मुलीची झलक बघायला मिळाली नाही.

मुलीशी संबंधीत कोणतीही माहिती देऊ नका
मुलीच्या जन्मानंतर विराट आणि अनुष्का यांनी मीडिया फोटोग्राफर्सना एक नोट लिहित विनंती केली होती. या नोटमध्ये त्यांनी त्यांच्या मुलीचे फोटो फोटोग्राफर्सने काढू नयेत असे म्हटले होते. आपल्या मुलीचा फोटो मीडियात येऊ नये, अशी या दोघांची इच्छा आहे. ‘आई-वडील म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो. आमच्या मुलीचे कोणीही फोटो काढू नयेत. कृपया आम्हाला सहकार्य करा’ असे त्यांनी म्हटले आहे. पुढे नोटमध्ये विराट आणि अनुष्काने योग्य वेळ येताच मुलीचे फोटो शेअर करु असे म्हटले आहे. ‘तुम्हाला हवी असलेली माहिती आम्ही तुम्हाला नक्की देऊ. पण आमच्या मुलीशी संबंधीत कोणतीही माहिती देऊ नका. आम्हाला माहित आहे की, तुम्ही समजू शकतात आणि याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत', असे त्यांनी म्हटले होते.

चार महिन्यांनी कामावर परतणार अनुष्का
अनुष्काच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे ती शेवटची मोठ्या पडद्यावर 'झिरो' या चित्रपटात दिसली होती. यात तिच्यासह शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर तिच्या नव्या चित्रपटाची घोषणा झालेली नाही. बाळाच्या जन्माच्या चार महिन्यांनी ती कामावर परतणार आहे. निर्माती म्हणून अनुष्काची 'पाताल लोक' ही वेब सिरीज बरीच गाजली होती. याशिवाय तिने 'बुलबुल' या चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट 24 जून 2020 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता.

बातम्या आणखी आहेत...