आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आगामी:क्राइम थ्रिलर 'पाताल लोक'नंतर अनुष्का शर्मा घेऊन येतेय 'बुलबुल', 24 जूनला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार चित्रपट

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'बुलबुल' हा चित्रपट येत्या 24 जूनला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून लवकरच त्याचा ट्रेलर रिलीज होईल.

अनुष्का शर्मा तिच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या 'पाताल लोक' या क्राइम थ्रिलर वेब सीरिजनंतर आता 'बुलबुल' हा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे जो एखाद्या परीकथेसारखा दिसत आहे. नेटफ्लिक्स ओरिजिनलवर हा चित्रपट येत्या 24 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

अलीकडेच अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन आगामी 'बुलबुल' या प्रोजेक्टची माहिती देत ​​पहिला लूक शेअर केला आहे. यासह तिने लिहिले की, “बुलबुलचा हा फर्स्ट लूक आहे. स्वत:चा शोध, न्याय, षड्यंत्र आणि रहस्यांची ही एक उत्कृष्ट कथा आहे. नेटफ्लिक्सवर लवकरच येत आहे.'

'बुलबुल'च्या फर्स्ट लूकमध्ये एक मुलगी तिच्या स्वप्नातील जगात झाडांवर उडी मारताना दिसत आहे. दिसणा-या मुलीचे पाय मात्र उलटे आहेत, ज्यावरुन हा एक हॉरर थ्रिलर चित्रपट असल्याचा अंदाज लावला जाऊ शकतो. यापूर्वीही अनुष्काने तिच्या क्लीन स्लेट प्रॉडक्शन हाऊसमध्ये 'परी' हा हॉरर चित्रपट बनवला आहे. इतर स्टारनी केलेल्या पोस्टमध्ये 'बुलबुल' एक रहस्यमय कथा असल्याचे म्हटले गेले आहे. या चित्रपटात राहुल बोस, अविनाश तिवारी, पाओली दाम, परमब्रत चटर्जी आणि तृप्ती डिमरी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील.

यापूर्वी अनुष्का शर्माने तिचा भाऊ करणेशसमवेत 'पाताल लोक' ही वेब सीरिज तयार केली आहे, जी 15 मे रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रसारित झाली होती. या मालिकेला काही लोकांचे प्रेम मिळाले असले तरी तिच्या वेगळ्या संकल्पनेमुळे यावरही बरीच टीकादेखील झाली. 'बुलबुल' आता 24 जूनला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. लवकरच त्याचा ट्रेलर रिलीज होईल.  

बातम्या आणखी आहेत...