आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चकदा एक्सप्रेस:वामिकाच्या जन्मानंतर चित्रपटाबद्दल नर्व्हस होती अनुष्का शर्मा, म्हणाली- मी पूर्वीसारखी मजबूत नव्हती

2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुष्का शर्मा लवकरच 4 वर्षांनंतर 'चकदा एक्सप्रेस' नंतर पुन्हा पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगबाबत अभिनेत्रीने नुकताच खुलासा केला आहे. अनुष्काने सांगितले की, वामिका झाल्यानंतर शूटिंगदरम्यान ती थोडी नर्व्हस वाटत होती. अनुष्काची मुलगी वामिकाचा जन्म जानेवारी 2021 मध्ये झाला.

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान, अनुष्काने मुलगी झाल्यानंतर पहिल्यांदाच शुटिंग करण्याचा तिचा अनुभव सांगितला आणि म्हणाली, "मी चकदा एक्स्प्रेसच्या पदार्पणाचा एक भाग होते. मला त्यात आधीच काम करायचे होते पण कोविडमुळे. चित्रपट पुढे ढकलला गेला आणि नंतर मी गरोदर राहिली. शेवटी जेव्हा मी या चित्रपटात काम करायला सुरुवात केली तेव्हा मी खूप घाबरले होते. कारण नुकतेच मी एका बाळाला जन्म दिला आणि मी प्रेग्नेंसी आधी जेवढी स्ट्राँग होते तेवढी प्रेग्नेंसी नंतर नव्हते.

या चित्रपटाबद्दल अनुष्काला खात्री नव्हती
अनुष्का पुढे म्हणाली, मी 18 महिन्यांपासुन कोणतेही फिजिकल ट्रेनिंग न घेतल्यानेही माझी शारिरीक स्थिती चागंली नव्हती. मी हा प्रोजेक्ट करु की नको याबद्दल मला स्वत: खात्री नव्हती. मला माझा आतला आवाज नेहमी सांगत होता की असेच अनेक प्रकारचे काम मला आणखीन करायचे आहेत.

फेब्रुवारी 2023 मध्ये होणार 'चकदा एक्सप्रेस' प्रदर्शित
'चकदा एक्सप्रेस' हा भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार झूलन गोस्वामीचा बायोपिक चित्रपट आहे. अनुष्का अनेकदा तिच्या क्रिकेट सरावाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अनुष्का शर्मा शेवटची 2018 मध्ये शाहरुख खान आणि कतरिना कैफसोबत 'झिरो' चित्रपटात दिसली होती. हा बायोपिक चित्रपट फेब्रुवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...