आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चकदा एक्स्प्रेस':चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंग्लंडला जाणार अनुष्का शर्मा, म्हणाली - असे वाटते, जणू मी पुन्हा पहिल्याच चित्रपटात काम करतेय...

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'चकदा एक्स्प्रेस'चे चित्रीकरण सुरु, कठोर प्रशिक्षणानंतर आता इंग्लंडमधील मैदानावर अनुष्का दाखवणार कर्तब

अभिनेत्री अनुष्का शर्मा तीन वर्षांनंतर (कोरोना महामारी आणि मॅटर्निटी ब्रेकमुळे) चित्रपटात पुनरागमन करत आहे. महिला क्रिकेटमधूल सर्वात वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या जीवनावर आधारित चित्रपटातून ती पुनरागमन करत आहे. नेटफ्लिक्सद्वारे त्याची निर्मिती केली जात आहे. चित्रपटाचे नाव आधीच निश्चित झाले आहे, ते म्हणजे 'चकदा एक्स्प्रेस'. चित्रपटासाठी अनुष्काने कठोर प्रशिक्षण घेतले आहे. चित्रपट हा लार्ज स्केलवर चित्रीत केला जाणार आहे. अनुष्काचे स्वतःचे बॅनर क्लीन स्लेट फिल्म्सद्वारा निर्मिती होत असलेल्या चकदा एक्स्प्रेसचे चित्रीकरण सुरु झाले आहे. एका पोस्टरद्वारे अनुष्काने त्याची माहिती दिली आहे.

चित्रपटाच्या पुनश्च प्रवासासाठी उत्साहित
अनुष्का म्हणते, असे वाटते जणू मी पुन्हा पहिल्या चित्रपटात काम करत आहे. चकदा एक्स्प्रेससह या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी मी अतिशय उत्साहित आहे. या चित्रपटाकडून मला खूप अपेक्षा आहेत. दुर्दैवाने कोरोनामुळे चित्रपटापासून दूर रहावे लागले. मला लवकरात लवकर चित्रपटात काम करायचे आहे. खूप आधीच मला चाहते आणि प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी पुनरागमन करायचे होते. ती वेळ आता आली आहे.

30 दिवसांच्या चित्रीकरणासाठी अनुष्का जाणार इंग्लंडला
वृत्तानुसार, या चित्रपटाच्या 30 दिवसांच्या चित्रीकरणासाठी अनुष्का इंग्लंडला जाणार आहे. काही चित्रीकरण भारतातही होणार आहे. स्वतःला झुलनच्या भूमिकेत उत्तम प्रकारे परावर्तित करण्यासाठी अनुष्का अनेक महिन्यांपासून तयारी करत होती. आता ती चित्रीकरणासाठी पूर्णपणे तयार आहे. ती म्हणते, एवढ्या मोठ्या चित्रपटासाठी सर्वच विभागात प्रचंड तयारी करावी लागते. एका वेगळ्या अंदाजात चकदा एक्स्प्रेसची सुरुवात झाली, याचा आम्हाला खूप आनंद आहे.

चित्रपटाच्या माध्यमातून खास महिलांसाठी देणार एक सशक्त संदेश
अनुष्का सांगते, चकदा एक्स्प्रेसची कथा लोकांना निश्चित आवडेल. त्याचा संदेशही अतिशय महत्त्वपूर्ण असेल. मला एका महिलेची झाकोळलेली कथा लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. चित्रपटाचा निर्माता आणि माझा भाऊ कर्णेश शर्मा तसेच दिग्दर्शक प्रोसित रॉय यांच्यासह हा चित्रपट करायला मिळतोय याचा अभिमान आहे. क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पाहणा-या मुलींसाठी झुलन ही आदर्श आहे. 2018 मध्ये तिच्या सन्मानार्थ पोस्टाने तिकिटही प्रकाशित केले. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम झुलनच्या नावावर आहे, ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.

'चकदा...'च्या चित्रीकरणादरम्यान स्वतःला उत्तम प्रकारे सादर करण्याचा प्रयत्न करत आहे...

अनुष्का सांगते, सत्ये हे आहे की, पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या जगात महिलांना आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. झुलनच्या जीवनावर आधारित कथेला मी पूर्ण न्याय देईन अशी आशा आहे. मी अतिशय उत्साहित आहे. मला स्वतःला आव्हान देण्याची संधी मिळाली आहे. चकदा एक्स्प्रेसच्या चित्रीकरणादरम्यान मी प्रत्येक दिवशी स्वतःला उत्तम प्रकारे सादर करण्याचा प्रयत्न करत आहे.

सेटवरुन अनुष्काने शेअर केला व्हिडिओ
अनुष्काने एक व्हिडिओ शेअर करुन चकदा एक्स्प्रेसचे चित्रीकरण सुरु झाल्याची माहिती प्रेक्षकांना दिली. मुंबईच्या मेहबुब स्टुडिओमधील एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे. हा एक फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ आहे. जो तिच्या व्हॅनिटी व्हॅनवर संपतो. अनुष्काने त्यासह कॅप्शनमध्ये लिहिले, "ज्याच्याशी जोडले गेले, तेथे मी परत आले आहे." अनुष्काचा अभिनय दमदार होईल, अशी निर्मात्यांनाही आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...