आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूड ब्रीफ:कोरोनामुळे यावर्षी शूटिंग करणार नाही अनुष्का, 'द फॅमिली मॅन 3' मध्ये साऊथच्या स्टारसोबत दिसणार मनोज बाजपेयी, तिसऱ्या लाटेआधीच पूर्ण होणार 'आरआर..'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी...

अभिनेत्री अनुष्का शर्माने यावर्षी 11 जानेवारीला मुलगी वामिकाला जन्म दिला. सध्या ती पती विराट कोहलीसह या सुंदर क्षणांचा आनंद अनुभवतेय. दरम्यान, अशी बातमी आहे की अनुष्का यावर्षी पुन्हा कामावर परतणार नाही. तिची प्राथमिकता तिची मुलगी आहे आणि कोरोना महामारीच्या काळात तिला बाहेर जाऊन कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही. डॉक्टरांनी कोरोनाच्या तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. असा दावा केला जातोय की, ही तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तिने यावर्षी कुठल्याही चित्रीकरणाची योजना आखू नये, अशा सूचना आपल्या टीमला दिल्या आहेत. अनुष्का शेवटची शाहरुख खानसोबत 'झिरो' (2018) या चित्रपटात दिसली होती.

2. मनोज बाजपेयी स्टारर 'द फॅमिली मॅन 3' मध्ये दिसू शकतो विजय सेतूपती
मनोज बाजपेयी स्टारर ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजच्या दुसर्‍या सीझनमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा अक्किनेनी एका मोठ्या सरप्राईज पॅकेजच्या रूपात दिसली. आता अशी चर्चा आहे की, वेब सीरिजच्या तिसर्‍या सीझनमध्ये दक्षिण भारतीय अभिनेता विजय सेतूपती व्हिलनच्या भूमिकेत दिसू शकतो. दुसर्‍या सीझनप्रमाणेच तिसर्‍या सीझनमध्येही सस्पेन्स असण्याची बरीच अपेक्षा आहे. रिपोर्टनुसार, खरं तर या सीरिजच्या दुसर्‍या सीझनमधील श्रीलंकेच्या दहशतवाद्याच्या भूमिकेसाठी सेतूपतीकडे संपर्क साधला गेला. पण काही कारणास्तव त्याने ही ऑफर नाकारली. यावर्षी जानेवारीत रिलीज झालेल्या ‘मास्टर’ चित्रपटाद्वारे सेतूपतीने दक्षिण भारतात तसेच हिंदी पट्ट्यातही एक खास ओळख निर्माण केली आहे.

3. तिसऱ्या लाटेआधीच पूर्ण होणार 'आरआर..'
‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. सूत्रानुसार, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे थांबलेल्या या चित्रपटाचे शूटिंग पुन्हा एकदा सुरू होणार आहे. निर्माते आता थोडाही वेळ वाया घालवू इच्छित नाहीत. ते बॅक टू बॅक शेड्यूलचे शूटिंग करून हा चित्रपट पूर्ण करण्याच्या विचारात आहेत. आधी गाण्याचे चित्रीकरण केले जाईल आणि त्यानंतर महत्त्वाचे पॅचवर्क केले जातील. कोरोनाची तिसरी लाट जुलै-ऑगस्टमध्ये अपेक्षित आहे. यावर विश्वास ठेऊन निर्मात्यांना हा चित्रपट लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे. आलिया भट्ट आणि अजय देवगण दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत एनटीआर आणि राम चरण यांच्यासह पदार्पण करत आहेत, त्याचे बजेट सुमारे 325 कोटी रुपये आहे.

4. विजयने शेअर केला ‘बीस्ट’चा फर्स्ट लूक
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयच्या चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. मंगळवारी विजयने आपला ४७वा वाढदिवस साजरा केला. या निमित्त विजयने आपल्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. विजयने आपल्या येणाऱ्या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. बीस्टच्या पोस्टरमध्ये विजय राउडी लूकमध्ये हातात मशीन गण घेऊन दिसत आहेत. फोटोवरुन हा अॅक्शन चित्रपट असल्याचे कळते. या चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन करणार आहेत. त्यांनीच याची कथाही लिहिली आहे.

5. अमिताभ यांनी आवडत्या सहकलाकाराची ओळख करुन दिली, फोटो व्हायरल
सोमवारी अमिताभ बच्चन यांनी आपल्या सह-कलाकाराची सोशल मीडियावर ओळख करून दिली. फोटो पाहून तो श्वान असल्याचे काळले. हा फोटो शेअर करताना बिग बींनी लिहिले, 'कामावर मी माझ्या या सह-कलाकारासोबत असतो. तेव्हा सेटवरील सर्व वातावरण बदलून जाते. म्हणून तो सर्वांचा लाडका आहे.' त्यांच्या पोस्टवर त्यांची नात नव्या नंदाने पोस्ट केले, 'टोटली एडोरेबल.’ खरं तर, अमिताभ यांना श्वानांची आवड आहे. त्यांच्याकडे 'शैनोंक’ नावाचे श्वान होते त्याचा 2013 मध्ये मृत्यु झाला होता.

6. रिया कपूरच्या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटात हर्षवर्धन कपूरसोबत झळकणार अलाया
अनिल कपूरची मुलगी रिया कपूर सध्या वीरे दी वेडिंग २वर काम करत आहे. सोबतच ती इतर प्रोजेक्ट्सवरही काम करत आहे. यापैकी एक रोमँटिक-कॉमेडी चित्रपटावर ती आपला भाऊ हर्षवर्धन कपूरसोबत काम करणार आहे. सूत्रानुसार,”रेहाला स्क्रिप्ट आवडली आहे. आता ती यात हर्षला घेणार आहे. यात मुख्य अभिनेत्री म्हणून अलाया एफ योग्य निवड असल्याचे तिचे म्हणणे आहे. तिने अलायासोबत यावर चर्चादेखील केली आहे. सर्व काही ठीक राहिले तर यावर लवकरच काम सुरू होईल.

7. 'रॉकेट बॉइज’मध्ये होमी जहांगीर भाभाच्या भूमिकेत दिसणार जिम
आगामी शो ‘रॉकेट बॉइज’ भारतातील अत्यंत प्रतिभावंत अणू भौतिकशास्त्रज्ञ यांच्या जीवनावर आधाारित आहे. ही मालिका होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांच्या जीवनावर आधारित असेल. शोची निर्मिती निखिल आडवाणी आणि रॉय कपूर फिल्म्स यांनी संयुक्तपणे केली असून त्याचे दिग्दर्शन अभय पन्नू करणार आहेत. आजच्या काळातही भौतिकशास्त्रज्ञांची महानता आणि त्यांची प्रासंगिकता समजावून सांगण्यासाठी दोन्ही भौतिकशास्त्रज्ञांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि जीवनाबद्दल खोलवर विचार केला जाईल. यात जिम सर्भ होमी जे भाभाच्या भूमिकेत दिसणार असून, इश्वकसिंग विक्रम ए साराभाईच्या भूमिकेत दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...