आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेपोटिझम:अनुष्काचा को-अ‍ॅक्टर राहिलेल्या महेश शर्माचा आरोप, कलाकारांऐवजी कास्टिंग डायरेक्टर स्वत:लाच कास्ट करतात

मुंबई (अमित कर्ण)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
महेश शर्मा आणि अभिषेक बॅनर्जी. - Divya Marathi
महेश शर्मा आणि अभिषेक बॅनर्जी.
  • महेशने कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा आणि जोगी यांच्यावरही गंभीर आरोप लावले आहेत.

अनुष्का शर्माच्या बॅनरखाली बनलेल्या ‘पाताल लोक’ या वेब शोच्या कास्टिंगबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. 'सुई धागा'मध्ये अनुष्कासोबत काम करणारा अभिनेता महेश शर्माने या शोमध्ये व्हिलनची भूमिका साकारणार्‍या अभिषेक बॅनर्जी आणि इतर कलाकारांनी बेकायदेशीरपणे कास्टिंग एजन्सीचा फायदा घेतल्याचा आरोप केला आहे.

'सुई धागा'च्या सेटवर वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांच्यासोबत महेश शर्मा.
'सुई धागा'च्या सेटवर वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांच्यासोबत महेश शर्मा.

महेशने सांगितल्यानुसार, या शोसाठी त्याची आणि उर्वरीत कलाकारांच्या ऑडिशन संबंधित निर्माता-दिग्दर्शकांना पाठवण्यात आल्या नाहीत.  त्याऐवजी स्वतः कास्टिंग एजन्सीचे मालक आणि एजन्सीमध्ये काम करणा-या सहाय्यकांना कास्ट केले गेले. महेशने कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा आणि जोगी यांच्यावरही गंभीर आरोप लावले आहेत.

महेश म्हणाला, "कास्टिंग एजन्सींमध्ये आम्हा कलाकारांचे शोषण होत आहोत. अभिषेक बॅनर्जी आणि मुकेश छाबरा यांच्या कास्टिंग एजन्सीपासून ते इतर ठिकाणी जेथे यांचे सहाय्यक आहेत, तेच  बिग बजेटचे चित्रपट आणि वेब शोमध्ये कास्ट होत आहेत. अभिषेक बॅनर्जी स्वत: अनेक चित्रपट आणि वेब शोमध्ये दिसले आहेत."

अभिषेक बॅनर्जी 'पाताल लोक' मधील एका दृश्यात.
अभिषेक बॅनर्जी 'पाताल लोक' मधील एका दृश्यात.
  • आरोपांवर अभिषेकचे स्पष्टीकरण

अभिषेक बॅनर्जीने महेश शर्माच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना म्हटले की, 'महेशचे आरोप निराधार आहेत. परंतु मला त्याच्या चिंतांबद्दल माहिती आहे. माझा मुद्दा असा आहे की कोणताही दिग्दर्शक-निर्माता केवळ त्याच्या ओळखीच्या जोरावर कोणालाही त्याच्या प्रोजेक्टमध्ये घेत नाही. 'पाताल लोक'मधील निर्मात्यांच्या सांगण्यावरून मी ऑडिशन दिली, त्यानंतर मला विशाल त्यागीची भूमिका मिळाली."

अभिषेक बॅनर्जी 'ड्रीम गर्ल' आणि 'स्त्री' सारख्या चित्रपटांमध्ये दिसले आहेत.
अभिषेक बॅनर्जी 'ड्रीम गर्ल' आणि 'स्त्री' सारख्या चित्रपटांमध्ये दिसले आहेत.

तो पुढे म्हणतो, "दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वत: कास्टिंग डायरेक्शनच्या क्षेत्रात दहा वर्षे राहिलो आहे. या क्षेत्रात आल्यानंतर आठ वर्षांनी मला माझा पहिला प्रोजेक्ट मिळाला.  जर मी स्वतःला प्रमोट केले असते, तर मला खूप  आधी काम मिळआले असते. परंतु जर कोणी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले, अरे हा तर चांगली कामगिरी करत आहे. मग मी का नकार देऊ?"

बातम्या आणखी आहेत...