आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरी आली चिमुकली पाहुणी:अपारशक्ती खुराणाला कन्यारत्न, नाव ठेवले आरजोयी ए खुराणा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 27 ऑगस्टला आरजोयीचा जन्म झाला.

बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराणाच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. अपारशक्तीची पत्नी आकृती आहुजाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आकृती आणि बाळ दोघेही सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे. अपारशक्तीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून ही गोड बातमी चाहत्यांसोहत शेअर केली आहे. काही दिवसांपुर्वीच त्याने पत्नीच्या डोहाळे जेवणआचे फोटो आणि व्हिडिओदेखील शेअर केले होते. ही गोड बातमी समोर आल्यानंतर अपारशक्ती आणि आकृती यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

अपारशक्ती आणि आकृती यांनी त्यांच्या चिमुकलीचे नाव आरजोयी ए खुराणा ठेवले आहे. सोबतच त्याने आपल्या पोस्टमध्ये एका छोट्या हत्तीचा फोटो असलेले कार्ड शेअर केले आहे. या कार्डवर 27 ऑगस्ट 2021 ही तारीख दिसतेय. 27 ऑगस्टला आरजोयीचा जन्म झाला.

अपारशक्ती 'हेल्मेट'मध्ये दिसणार आहे
अपशक्तीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे म्हणजे त्याचा "हेल्मेट" हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या क्वर्की कॉमेडी चित्रपटात तो पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार असून हा चित्रपटात सामाजिक संदेश देतो. मोहनीश बहल यांची मुलगी प्रनूतनही या चित्रपटात त्याच्यासोबत दिसणार आहे.

अपारशक्तीने 'दंगल' चित्रपटातून केले होते पदार्पण
अपारशक्तीने आपली कारकीर्द रेडिओ जॉकी म्हणून सुरू केली. चंदीगडमध्ये जन्मलेला अपारशक्ती 'एमटीव्ही रोडीज'मध्ये पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आला होता. त्याने या शोसाठी ऑडिशन दिली होती. 2016 मध्ये त्याने 'दंगल' चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर त्याने 'स्ट्रीट डान्सर', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'स्त्री', 'लुका छुपी', 'पती पत्नी और वो' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

बातम्या आणखी आहेत...