आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेलमेट द मूव्ही:अपारशक्ती खुरानाने सांगितले आता कसे होईल रोमँटिक सीनचे शूटिंग, प्रनूतन बहलसोबत फेस शील्डमध्ये दिसला 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता रोमँटिक सीनचे शूटिंग कसे केले जाईल, हे अभिनेता अपारशक्ती खुरानाने मजेशीर अंदाजात सांगितले आहे.

कोरोनाव्हायरस महामारीमुळे जगभरात गोंधळ उडाला आहे. बरेच नियम बदलले आहेत आणि जीवनशैलीतही मोठा बदल झाला आहे. तब्बल तीन महिन्यांच्या गॅपनंतर आता चित्रपटसृष्टी आणि टीव्ही इंडस्ट्री हळूहळू पुर्वपदावर येत असून चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक कलाकाराला मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असून आता सेटवर सेटमध्ये सामाजिक अंतर राखणे आणि मास्क वापरणे अनिवार्य आहे. दरम्यान, आता रोमँटिक सीनचे शूटिंग कसे केले जाईल, हे अभिनेता अपारशक्ती खुरानाने मजेशीर अंदाजात सांगितले आहे.

अपशक्ती खुराना लवकरच 'हेलमेट' या चित्रपटात दिसणार असून हा चित्रपट एक सेक्स कॉमेडी आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना बरेच रोमँटिक सीन्स पहायला मिळतील. अपारशक्तीने अलीकडेच या चित्रपटाचा एक स्टिल शेअर केला आणि म्हटले की, आता यापुढे रोमँटिक सीनासाठीदेखील फेस शील्डचा वापर केला जाईल. विशेष म्हणजे अपारशक्तीने जो फोटो शेअर केला, त्यात एडिटिंगच्या मदतीने छायाचित्रातील चेह-यांवर फेस शील्ड लावण्यात आले आहे.

हा फोटो शेअर करताना अपारशक्तीने लिहिले की, "बरं झालं, हेलमेट चित्रपटातील हे दृश्य कोरोनाच्या आधीच चित्रीत झाले. अन्यथा, आजच्या काळात हे सुरक्षिततेसह चित्रित केले गेले असते.'

'दंगल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळवणा-या अपशक्ती खुरानाने बर्‍याच चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहेत. 'हेलमेट' चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची ही त्याची पहिली वेळ आहे. त्याच्यासोबत, या चित्रपटात प्रनूतन बहल देखील मुख्य भूमिकेत आहे. तिने लव्ह स्टोरीद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दिनो मोरियाने हेलमेट या चित्रपटाची सह-निर्मिती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...